मुंबई : जे. एन. पी. ए. मार्फत(JNPA) मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा गावातील मच्छीमारांचे झालेले नुकसान तातडीने भरून काढावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिले. संबंधित प्रकरणात मत्स्यव्यवसाय विभागाने नियमानुसार आवश्यक कार्यवाही करून हा प्रश्न मार्गी लावावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
https://prahaar.in/2026/04/21/law-on-temple-land-in-the-upcoming-session-revenue-minister-chandrashekhar-bawankule-royalty-waiver-on-soil-for-nurseries/
गस्ती नौका आणि ड्रोन खरेदीचा आढावा :
याच बैठकीत मत्स्यव्यवसाय विभागामार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या पाच गस्ती नौका आणि ड्रोनच्या खरेदी प्रक्रियेचा आढावाही घेण्यात आला. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.