- महाराष्ट्र भाजपकडून जिल्हानिहाय प्रभारी जाहीर
मुंबई : संघटन बांधणी मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र भाजपने मंगळवारी जिल्हानिहाय प्रभारींची नियुक्ती केली. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे रायगड दक्षिण जिल्ह्याच्या प्रभारी पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोकणात पक्षाची पकड अधिक घट्ट करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्याने हैराण झालेल्या नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील नागरिकांना आज सकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने ...
उत्तर महाराष्ट्रात नाशिक दक्षिण जिल्ह्याची धुरा माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली असून, नाशिक शहरासाठी मंगेश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. धुळे शहरात माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली असून, धुळे ग्रामीणसाठी रवींद्र अनासपुरे यांची नियुक्ती झाली आहे. जळगाव जिल्ह्यातही रोहिणी नायडू, अनुप अग्रवाल आणि प्रदीप पेशकार यांच्याकडे विविध विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अहिल्यानगर उत्तर भागात लक्ष्मण सावजी हे पक्षाचे काम पाहतील.






