राजस्थानमधील पाचपद्रा Pachpadra येथे उभारण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित रिफायनरीत आज म्हणजेच सोमवार २० एप्रिल रोजी दुपारी अचानक भीषण आग लागली. विशेष म्हणजे, मंगळवार (२१ एप्रिल) रोजी सकाळी ११:३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार होते. मात्र या घटनेमुळे आता उद्घाटनाच्या कार्यक्रमावर अनिश्चिततेचे सावट आले आहे.
https://prahaar.in/2026/04/20/japan-earthquake-tsunami-natural-disaster-in-japan-80-cmt-sunami-hits-after-7-4-magnitude-earthquake-administration-issues-alert/
आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की अन्य काही कारण आहे, याचा तपास तांत्रिक तज्ञ आणि सुरक्षा यंत्रणांकडून सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात घातपाताची शक्यता अधिक असल्याने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अवघ्या २४ तास आधी ही घटना घडल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. कडक सुरक्षा व्यवस्था असूनही आग लागल्याने व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
https://prahaar.in/2026/04/20/iran-america-war-irgcs-dominance-in-irans-decision-making-process-possibility-of-talks-with-america-low/
सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून, झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतरच उद्घाटन सोहळ्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.