मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी सुरूच आहे. पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला सात गडी राखून पराभूत करत दणका दिला. त्यामुळे मुंबईला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, संघाला आता “काही कठीण प्रश्नांची उत्तरे देण्याची” आणि जबाबदारी स्वीकारण्याची गरज आली आहे. पांड्याचा हा संताप कोणाला उद्देशून आहे हे समजू शकले नसले तरी यावरून एवढं निश्चित झालं आहे की मुंबई संघाच्या अंतर्गत वादाचा परिणाम त्यांच्या खेळावर दिसून येत आहे.
https://prahaar.in/2026/04/16/pat-cummins-ipl-2026-pat-cummins-set-for-ipl-comeback-fully-fit-to-bowl/
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, मुंबईने २० षटकांत ६ गडी गमावून १९५ धावा केल्या. क्विंटन डी कॉकने ६० चेंडूंमध्ये शानदार नाबाद ११२ धावा केल्या, परंतु त्याचे शतक विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. त्याने नमन धीरसोबत ६८ चेंडूंमध्ये १२२ धावांची भागीदारी केली, तर कर्णधार पांड्याने २३ चेंडूंमध्ये ४१ धावा जोडल्या. गोलंदाजीमध्ये, अर्शदीप सिंगने २२ धावांत ३ बळी घेत प्रभावी कामगिरी नोंदवली, तर शशांक सिंगने एक बळी घेतला.
🚨 EMOTIONAL STATEMENT BY HARDIK PANDYA AFTER LOSING THE MATCH AGAINST PUNJAB KINGS 🚨
Hardik Pandya said 🗣️
“To be very honest, I have nothing to say at the moment. We need to go back to the drawing board and see what we are lacking. Is it individuals? Is it as a group? Is it… pic.twitter.com/kyx6PCQ7f5
— Cricket Central (@CricketCentrl) April 16, 2026
https://prahaar.in/2026/04/16/former-cricketer-vinod-kambli-at-risk-of-brain-stroke/
या पराभवानंतर मुंबईचा संघ या हंगामात आपले अंतर्गत मतभेद विसरून पुन्हा एकदा आपल्या गेमवर फोकस करणार का? याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष असणार आहे.