– जाणून घ्या नेमकं प्रकरण काय
आयपीएल २०२६ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील सामना मैदानापुरताच मर्यादित राहिला नाही, तर आता तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ५ एप्रिल रोजी बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आलेल्या एका गाण्यावरून सीएसकेने थेट बीसीसीआयकडे तक्रार केली आहे.
सीएसकेच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या डावापूर्वी “डोसा, इडली, सांबार, चटणी” हे गाणे वाजवून संघाची खिल्ली उडवण्यात आली. यामुळे खेळाडूंचा अपमान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
डीजेच्या वर्तनावरही आक्षेप :
https://prahaar.in/2026/04/13/hardik-pandya-hat-trick-in-mumbais-defeat-hardik-pandyas-captaincy-criticized-by-veteran-players-and-everyone-around/
‘डोसा-इडली’ गाण्यावरून आधीही वाद :
‘सदर्न डर्बी’त वाढता तणाव :
चेन्नई आणि बंगळूर यांच्यातील सामने आता ‘सदर्न डर्बी’ म्हणून ओळखले जातात आणि ही स्पर्धा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. विशेष म्हणजे, 2024 पासून RCB ने CSK विरुद्ध सलग चार सामने जिंकले आहेत, ज्यामुळे दोन्ही संघांमधील तणाव आणखी वाढला आहे.
BCCI च्या निर्णयाकडे लक्ष :
या संपूर्ण प्रकरणावर आता BCCI आणि IPL गव्हर्निंग कौन्सिल काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वादावर पुढे काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.