कोल्हापूर : हातकणंगल्यात झालेल्या अपघातामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. मृत उदय अशोक जाधव (34) आणि त्यांचा पाच वर्षाचा मुलगा धैर्यशील यांच्यावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
नेमका अपघात घडला कसा?
https://prahaar.in/2026/04/14/nashik-crime-news-trimbakeshwar-temple-trustee-purushottam-kadlag-arrested-police-sting-operatio/
उदय जाधव यांच्यावर कुटुंबाचा भार होता, आई वडील, पत्नी आणि दोन मुलांसह ते अंबप येथे राहत होते, शिरोली एमआयडीसीत नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आपला एकुलता एक मुलाचं असं अपघाती निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
https://prahaar.in/2026/04/14/mumbai-crime-mumbai-rocked-three-murders-in-a-single-day-and-the-accused-are/
कारचालकाने अनेक वाहनांना उडवले
तळसंदे गावच्या वळणावर या गाडीने एक दुचाकीला धडक दिली त्यानंतर वाठारच्या दिशेने वेगाने जाताना वारणा बाजार येथील पेट्रोल पंपासमोर पुन्हा एका चारचाकी सुमोला धडक दिली शिवाय एका दुचाकीला उडवले. यात अनेक जण जखमी झाले आहे. मध्यधुंद चारचाकी चालक सदशिव चिकान्नवरमठ याला लवकरात लवकर पकडून अटक करा अशी मागणी पोलिसांकडे जोर धरत आहे.