मुंबई : “गेल्या २८ दिवसांपासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर होणारे सर्व आरोप हे केवळ हेतूपुरस्सर आणि बदनामी करण्यासाठी केले जात आहेत. केवळ तर्कवितर्क आणि रंजक अफवांच्या आधारावर बदनामी करण्याचा हा नवा आणि चुकीचा पायंडा पाडला जात आहे”, अशा शब्दांत राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. खरात प्रकरणात आपला कोणताही आर्थिक किंवा जमीन व्यवहार नसल्याचा पुनरुच्चार करतानाच, या प्रकरणातील ‘सत्य’ लवकरच समोर येईल, असा दावाही त्यांनी केला.
https://prahaar.in/2026/04/14/ashok-kharat-ed-takes-major-action-in-nashik-luxury-car-of-fraudster-kharat-seized-property-attached/
रूपाली चाकणकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली सविस्तर बाजू मांडली आहे. राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोप होत असतात, मात्र सध्याच्या प्रकरणात आरोप करणाऱ्यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. निनावी पत्राचा आधार घेऊन केवळ कपोलकल्पित कथा रंगवल्या जात असल्याचा दावा चाकणकर यांनी केला.
https://prahaar.in/2026/04/13/ashok-kharat-ed-raids-in-ashok-kharat-case/
पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेले एक निनावी पत्र माध्यमांपर्यंत पोहोचवून दिवसभर चर्चासत्रे घडवून आणली गेली. या बदनामीच्या कुटील डावामागे नेमके कोणाचे ‘सौजन्य’ आहे, हे समोर आले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनीही ज्या पत्रावर नाव आणि पत्ता नाही, अशा पत्राला कायदेशीरदृष्ट्या महत्त्व देता येत नाही, असे स्पष्ट केले असतानाही हे पत्र कोठून आले आणि कोणी लिहिले याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
खरातच्या दुष्कृत्यात दुरान्वयेही संबंध नाही
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या एकतर्फी बातम्यांवर प्रतिक्रिया का दिली नाही, याचे कारणही चाकणकर यांनी स्पष्ट केले. “एसआयटी आणि तपास यंत्रणांना निष्पक्षपातीपणे चौकशी करता यावी, हाच माझा हेतू होता. खरात प्रकरणात कोणत्याही दुष्कृत्यात आमचा दुरान्वयेही संबंध नाही,” असे त्यांनी सांगितले.