Home ताज्या घडामोडी पं. हृदयनाथ मंगेशकरांचे भाषण अन् भावविवश आशाताई

पं. हृदयनाथ मंगेशकरांचे भाषण अन् भावविवश आशाताई

पं. हृदयनाथ मंगेशकरांचे भाषण अन् भावविवश आशाताई
Asha bhosle style

‘स्वरस्वामिनी आशा’ या पुस्तकाचे प्रकाशन विले पार्लेतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या भाषणाने आशाताईं भावूक झाल्या. खान्देशची राजधानी ठाणेरे गावात ८-९ वर्षांच्या आशाताई आणि मी भाकरी, तिखट तेल या अन्नावर अनेक वर्षे जगलो. आशाताई सगळ्यात सुदृढ, मीनाताई कृश, माझा एक पाय कृश, मीनाताई, दीदी मुंबईत पण घरातली सगळी कामे आशाताईला करायला लागायची आणि मला सांभाळणे, माझे सगळे ती करायची, आईही करणार नाही, ते आशाताई करायची. काही ऋण, उपकार आपल्याला फेडता येत नाहीत, त्यातले हे ऋण आहेत, अशा शब्दात ज्येष्ठ गायक व संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या बहिणीबद्दलचे ऋण व्यक्त केले. यावेळी आशाताई भावूक झाल्याचे पहायला मिळाले.

साडी, टिकली आणि फुलं
आशा भोसले यांच्या स्टाइलमध्ये काही गोष्टी कायम असायच्या. वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपरिक साड्या, कपाळावर मोठी टिकली आणि कोणतीही हेअर स्टाइल असो त्यात फुलं माळलेली असायचीच. हा त्यांचा सिग्नेचर लूक त्यांनी देश-विदेशातील प्रत्येक मंचावर अभिमानाने सादर केला. मोत्यांच्या माळा, सोने किंवा डायमंड ज्वेलरीसोबत त्यांच्या हातात दिसणारे खास ब्रेसलेटही त्यांच्या स्टाइलचा भाग बनले.

इंदूरच्या खाद्य संस्कृतीवर विशेष प्रेम
इंदूरचे रहिवासी असलेले नातेवाईक मनोज बिनवाले यांच्या मते, आशाताईंना सिहोरच्या शरबती गव्हाच्या पोळ्या खूप आवडत होत्या आणि त्या अनेकदा इंदूरहून गहू मागवत असत. इंदूरच्या खाद्यसंस्कृतीशी त्यांचे विशेष प्रेम होते. सराफाच्या खाऊ गल्लीतील गुलाबजाम, रबडी आणि दहीवडे त्यांना खूप आवडत होते. बालपणी त्या सराफा चौपाटीला जात असत.