मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर दिसू लागला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्याने तसेच होर्मुज सामुद्रधुनीत नाकेबंदीची शक्यता निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर झपाट्याने वाढले आहेत.
https://prahaar.in/2026/04/12/google-pay-launches-pocket-money-feature-now-safe-digital-transactions-are-possible-from-children-to-seniors/
अमेरिकेने होर्मुज सामुद्रधुनीकडे जाणाऱ्या जहाजांवर निर्बंध घालण्याचे संकेत दिल्यानंतर बाजारात अनिश्चितता वाढली आहे. होर्मुज हा जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम जागतिक पुरवठ्यावर होतो.