मुंबई : RCB ने वानखेडेच्या ऐतिहासिक मैदानावर दमदार खेळ करत Mumbai Indians ला १८ धावांनी पराभूत केले. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या नावावर सलग तिसरा पराभव नोंदवला गेला असून संघाची स्थिती पॉईंट टेबलमध्ये खालावली आहे. कर्णधार हार्दिक पंड्या Hardik Pandya याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र आरसीबीच्या फलंदाजांनी तो पूर्णपणे चुकीचा ठरवला.
https://prahaar.in/2026/04/10/ipl-2026-points-table-rajasthan-royals-on-top-after-15-matches-these-4-teams-are-leading-the-playoff-race/
यानंतर कर्णधार रजत पाटीदारने मैदानात येताच चौकार-षटकारांची आतषबाजी केली. त्याने केवळ २० चेंडूत ५३ धावा करत डावाला वेग दिला. शेवटी टीम डेव्हिडने १६ चेंडूत नाबाद ३४ धावा करत आरसीबीला २४२ धावांपर्यंत पोहोचवले.
सूर्या (३३), हार्दिक पांड्या (४०) यांनी प्रयत्न केले, पण आरसीबीच्या गोलंदाजीसमोर मुंबईचा डाव २२२ धावांवरच थांबला. त्यामुळे मुंबईला १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.