– राज्यात वाढत्या अत्याचारांमुळे नागरिकांचा संताप
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. एकीकडे अशोक खरात प्रकरणामुळे संतापाची लाट उसळलेली असतानाच, दुसरीकडे अहिल्यानगरमधील अॅसिड हल्ल्याचे प्रकरण अद्याप ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूर (Pandharpur) येथे एका तरुणीवर अॅसिड हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पंढरपूर दौरा सुरू असतानाच ही घटना घडल्याने प्रशासनातही खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. मात्र, आरोपी अद्याप फरार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
https://prahaar.in/2026/04/07/new-twist-in-ashok-kharat-case-after-ias-two-senior-women-police-officers-are-being-discussed/
दरम्यान, जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वरकटणे येथे आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धनगर समाजातील मेंढपाळ आणि एका महिलेला काठीने मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.