छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको एन-६ परिसरातील साईनगर येथे काल रात्री उशिरा गोळीबाराची एक थरारक घटना घडली. ३१ वर्षीय समीर नाईक या तरुणाने राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गोळी कानाजवळून डोक्याच्या आरपार गेल्याने समीरची प्रकृती अत्यंत गंभीर असून, त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकी घटना काय?
समीर नाईक हा आपल्या आई आणि लहान भावासोबत साईनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. तो व्यवसायाने पौरोहित्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. घटनेच्या दिवशी सायंकाळी समीरची आई बजरंग चौकातील आपल्या बांगड्यांच्या दुकानात गेली होती. घरात समीर एकटाच असताना हा धक्कादायक प्रकार घडला. रात्री उशिरा जेव्हा समीरचा लहान भाऊ घरी परतला, तेव्हा त्याला समीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता आणि शेजारीच एक पिस्तूल पडलेले आढळून आले.
https://prahaar.in/2026/04/04/in-saphale-an-st-driver-took-off-his-uniform-flexed-his-muscles-and-issued-an-open-challenge-to-a-passenger-leading-to-a-massive-brawl-at-the-bus-depot/
नैराशातून पाऊल उचलल्याचा संशय
पोलीस तपास सुरू
या घटनेबाबत माहिती देताना सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी सांगितले की, “घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक पोहोचले असून तपास सुरू आहे. समीरने वापरलेले पिस्तूल बेकायदेशीर आहे की अधिकृत, तसेच यामागे अन्य काही कारण आहे का, याचा शोध घेतला जात आहे.” समीरच्या या कृत्यामुळे परिसरात दहशतीचे आणि हळहळीचे वातावरण पसरले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, समीरची प्रकृती अद्यापही चिंताजनक असून डॉक्टर त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.