Home ब्रेकिंग न्यूज Telangana Crime : पतीसोबत वाद झाला अन् संतापाच्या भरात आईने थेट तीन चिमुकल्यांना पाण्याच्या टाकीत फेकलं पुढे…

Telangana Crime : पतीसोबत वाद झाला अन् संतापाच्या भरात आईने थेट तीन चिमुकल्यांना पाण्याच्या टाकीत फेकलं पुढे…

0
Telangana Crime : पतीसोबत वाद झाला अन् संतापाच्या भरात आईने थेट तीन चिमुकल्यांना पाण्याच्या टाकीत फेकलं पुढे…
(Photo: AI)

Telangana Crime : तेलंगणामधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पतीसोबत झालेल्या वादानंतर एका महिलेने आपल्या तीन चिमुकल्या मुलांना पाण्याच्या टाकीत फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत तिन्ही मुलांचा बुडून मृत्यू झाला. मुलांना टाकीत टाकल्यानंतर महिलेने स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांनी तिला वाचवण्यात यश मिळवले. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील केशमपेटा मंडळातील नित्यारेकुला गावात घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

दोन वर्षांची मुलगी आणि आठ महिन्यांच्या जुळ्या बाळांचा मृत्यू

मृत मुलांची नावे प्रियंका, प्रिन्स आणि प्रीती अशी आहेत. प्रियंका अवघ्या दोन वर्षांची होती, तर जुळी भावंडं असलेले प्रिन्स आणि प्रीती केवळ आठ महिन्यांचे होते. प्राथमिक माहितीनुसार, श्रीवर्षा असे आरोपी महिलेचे नाव असून, तिचा पती कंडेना चेन्नय्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी इलेक्ट्रिशियन आणि कार चालक म्हणून काम करतो. पती-पत्नीमध्ये नेमक्या कोणत्या कारणावरून वाद झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या वादातूनच श्रीवर्षाने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.

https://www.prahaar.in/2026/11/29/13-people-including-4-childrens-died-in-horrific-car-accident-on-ranchi-patna-national-highway-in-the-ramgarh-district-of-jharkhand/

मुलांना टाकीत फेकल्यानंतर स्वतःही केली आत्महत्येचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने आपल्या तिन्ही मुलांना एकामागून एक पाण्याच्या टाकीत फेकले. त्यानंतर तिने स्वतःही टाकीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार काही स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.नागरिकांनी महिलेला पाण्याबाहेर काढले. तिन्ही मुलांनाही टाकीतून बाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे, आपल्या तिन्ही लेकरांना गमावल्यानंतर वडील चेन्नय्या यांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, पती-पत्नीमधील वादाचे नेमके कारण काय होते, महिलेने इतके टोकाचे पाऊल का उचलले आणि घटनेपूर्वी नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या, याचा शोध पोलीस घेत आहेत.महिलेची मानसिक स्थिती आणि घटनेमागील परिस्थिती यांचाही तपास केला जात आहे. तीन निष्पाप चिमुकल्यांच्या मृत्यूमुळे नित्यारेकुला गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here