Home क्राईम Solapur Crime News: आईला त्रास देत असल्याच्या रागातून भावानेच भावाचा कुऱ्हाडीने वार करून खून; सोलापुरातील घटना

Solapur Crime News: आईला त्रास देत असल्याच्या रागातून भावानेच भावाचा कुऱ्हाडीने वार करून खून; सोलापुरातील घटना

0
Solapur Crime News: आईला त्रास देत असल्याच्या रागातून भावानेच भावाचा कुऱ्हाडीने वार करून खून; सोलापुरातील घटना

Solapur Crime News: सोलापूर शहरातील उमा नगरी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत आईला त्रास देत असल्याच्या कारणावरून एका भावाने दुसऱ्या भावावर कुऱ्हाडीने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात संभाजी देविदास माने (वय 35, रा. मानेवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचा सख्खा भाऊ तानाजी देविदास माने याचे नाव समोर आले आहे. ही घटना फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

आईला त्रास देण्यावरून दोघा भावांमध्ये वाद

पोलिसांकडून आणि स्थानिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संभाजी माने यांना दारूचे व्यसन होते. ते दारू पिऊन आईला त्रास देत असल्याचे सांगण्यात येत आहे. याच कारणावरून दोन्ही भावांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती आहे.

मध्यरात्री सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास संभाजी यांनी पुन्हा दारूच्या नशेत आईला त्रास दिल्याचा आरोप आहे. यावरून संतापलेल्या तानाजी यांनी घरातील कुऱ्हाडीने संभाजी यांच्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संभाजी यांचा मृत्यू झाला. (Crime News)

पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून रक्ताचे नमुने आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा केले.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपीची भूमिका आणि हत्येमागील नेमकी परिस्थिती याबाबत पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here