Home महत्वाची बातमी Bank Holiday December 2026 : डिसेंबरमध्ये बँका किती दिवस राहणार बंद ? RBI ची सुट्ट्यांची यादी जाहीर

Bank Holiday December 2026 : डिसेंबरमध्ये बँका किती दिवस राहणार बंद ? RBI ची सुट्ट्यांची यादी जाहीर

0
Bank Holiday December 2026 : डिसेंबरमध्ये बँका किती दिवस राहणार बंद ? RBI ची सुट्ट्यांची यादी जाहीर
Bank Holiday December 2026

Bank Holiday December 2026 : जर तुम्ही डिसेंबर महिन्यात बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण डिसेंबर २०२६ मध्ये देशातील विविध राज्यांमध्ये अनेक दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे चेक क्लिअरन्स, केवायसी, डिमांड ड्राफ्ट किंवा इतर बँकिंग कामांसाठी शाखेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी तपासणं गरजेचं आहे.

२०२६ वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर आता सुरू होणार आहे. या महिन्यात नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासह अनेक स्थानिक सण आणि विशेष दिवसांमुळे बँका बंद राहणार आहेत. याशिवाय दर रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारीही बँकांचे कामकाज बंद असेल. डिसेंबर महिन्यात ६, १३, २० आणि २७ डिसेंबर रोजी रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल. तर १२ डिसेंबर आणि २६ डिसेंबर रोजी दुसरा आणि चौथा शनिवार असल्यामुळे बँका बंद राहतील. याशिवाय २५ डिसेंबर रोजी नाताळनिमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असेल.

मात्र, काही राज्यांमध्ये स्थानिक सणांमुळे अतिरिक्त सुट्ट्या असणार आहेत. विशेषतः सिक्कीम आणि मेघालयमधील बँक ग्राहकांना या महिन्यात अधिक सुट्ट्यांचा सामना करावा लागणार आहे. सिक्कीममध्ये ९, १० आणि ११ डिसेंबर रोजी लोसुंग आणि नामसुंग सणानिमित्त बँका बंद राहतील. तर मेघालयमध्ये १२ डिसेंबर रोजी पा तोगन नेंगमिंजा संगमा यांची पुण्यतिथी, १८ डिसेंबर रोजी यू सोसो थाम यांची पुण्यतिथी आणि ३० डिसेंबर रोजी यू कियांग नांगबाह यांच्या पुण्यतिथीनिमित्त बँकांचे कामकाज बंद असेल.

https://www.prahaar.in/2026/11/28/change-the-look-of-google-maps-new-visual-mode-makes-roads-visible-more-clearly-know-what-is-special/

आता पाहूया डिसेंबर महिन्यातील महत्त्वाच्या बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी.

१ डिसेंबर रोजी स्वदेशी श्रद्धा दिन आणि राज्य स्थापना दिनानिमित्त अरुणाचल प्रदेशमधील इटानगर आणि नागालँडमधील कोहिमा येथे बँका बंद राहतील.

३ डिसेंबर रोजी संत फ्रान्सिस झेवियर यांच्या सणानिमित्त गोव्यातील पणजी येथे बँकांना सुट्टी असेल.

९ ते ११ डिसेंबर या तीन दिवसांत सिक्कीममधील गंगटोक येथे लोसुंग आणि नामसुंग सणानिमित्त बँका बंद राहतील.

१२ डिसेंबर रोजी मेघालयातील शिलाँग येथे पा तोगन नेंगमिंजा संगमा यांच्या पुण्यतिथीनिमित्त बँका बंद असतील.

१८ डिसेंबर रोजी यू सोसो थाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिलाँगमध्ये बँकांना सुट्टी असेल.

१९ डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिनानिमित्त पणजी येथील बँका बंद राहतील.

२४ डिसेंबर रोजी नाताळच्या पूर्वसंध्येला ऐझॉल, शिलाँग आणि कोहिमा यांसारख्या शहरांमध्ये बँका बंद राहतील.

२५ डिसेंबर रोजी नाताळनिमित्त देशातील जवळपास सर्व प्रमुख शहरांमध्ये बँकांना सुट्टी असेल. यामध्ये मुंबई, नागपूर, पुणे, नवी दिल्ली, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद, जयपूर, भोपाळ, लखनौ यांसह अनेक शहरांचा समावेश आहे.

२६ डिसेंबर रोजी ऐझॉलमध्ये नाताळनिमित्त अतिरिक्त सुट्टी असेल. याच दिवशी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.

३० डिसेंबर रोजी शिलाँगमध्ये यू कियांग नांगबाह यांच्या पुण्यतिथीनिमित्त बँका बंद असतील.

तर ३१ डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ऐझॉल आणि शिलाँगमध्ये बँकांना सुट्टी असेल.

त्यामुळे डिसेंबरमध्ये बँकेत जाण्यापूर्वी तुमच्या शहरातील आणि राज्यातील सुट्ट्यांची यादी तपासून घ्या. दरम्यान, बँकेच्या शाखा बंद असल्या तरी UPI, मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगसारख्या डिजिटल सेवा बहुतांश वेळा सुरू राहतात. मात्र, शाखेत प्रत्यक्ष जाऊन करावी लागणारी कामं सुट्टीच्या दिवशी होणार नाहीत.

टीप: ही यादी राज्य आणि शहरानुसार बदलू शकते. त्यामुळे व्यवहारापूर्वी RBI किंवा संबंधित बँकेची अधिकृत सुट्टी यादी तपासावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here