Home ब्रेकिंग न्यूज Nashik : शेतातील बोरं तोडली अन् शेतमालकाचा संताप अनावर झाला, शाळकरी मुलीला मारहाण

Nashik : शेतातील बोरं तोडली अन् शेतमालकाचा संताप अनावर झाला, शाळकरी मुलीला मारहाण

0
Nashik :  शेतातील बोरं तोडली अन् शेतमालकाचा संताप अनावर झाला, शाळकरी मुलीला मारहाण

 Nashik : नाशिकच्या मालेगाव तालुक्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. शेतातील झाडावरून अवघी बोरं तोडल्याच्या कारणावरून एका शेतमालकाने शाळकरी मुलीला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, संबंधित व्यक्तीच्या कृत्यावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, अजंग-मालेगाव रस्त्यावरील काष्टी गावात हा प्रकार घडला. तीन शाळकरी मुली शाळेत जाण्यासाठी एसटी बसची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. यावेळी जवळच असलेल्या शेतातील बोराच्या झाडावर त्यांना बोरं दिसली. मुलींनी झाडावरील चार-पाच बोरं तोडली. मात्र, हा प्रकार शेतमालकाच्या लक्षात येताच तो संतापाच्या भरात मुलींजवळ पोहोचला.

बोरं तोडल्याचा जाब विचारण्याऐवजी त्याने एका मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली. संतापलेल्या शेतमालकाने मुलीच्या कानशिलात जोरदार मारली. हा फटका इतका जोरात होता की, मुलगी थेट रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे, उपस्थित नागरिकांनी या व्यक्तीला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्याशीही हुज्जत घातल्याचे व्हिडिओतून समोर आले आहे. ‘काय करायचे ते करून घ्या,’ अशा शब्दांत त्याने अरेरावी केल्याचेही सांगितले जात आहे.

https://www.prahaar.in/2026/11/28/shocking-incident-involving-an-18-year-old-young-woman-in-jalgaon/

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. चार-पाच बोरं तोडल्याच्या कारणावरून एका शाळकरी मुलीवर हात उचलण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. ]मात्र, उपलब्ध माहितीनुसार घटनेनंतरही गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणी काय भूमिका घेतात आणि संबंधित व्यक्तीवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here