मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील धारावीमधील काही रस्ते खराब झाल्याने तसेच खड्डे पडल्याने त्यांची सुधारणा महापालिकेच्यावतीने करण्यात येत असून जर धारावी विकास प्राधिकरणांतर्गत धारावीचा विकास केला जात असेल तर यावर महापालिकेच्यावतीने पैसा खर्च केला जात आहे असा सवाल स्थायी समिती सदस्यांनी केला आहे. मात्र, धारावी विकास प्रकल्पांतर्गत कामे सुरु असली तरी ही प्राथमिक स्तरावर ही प्रक्रिया असल्याने येथील जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये यासाठी धारावीतील रस्त्यांची सुधारणा करावी लागणार असल्याने खड्डे बुजवण्याच्या कामाला स्थायी समितीने मंजुरी दिली.
मुंबई शहरातील जी उत्तर विभागातील धारावीचा विकास केला जाणार असल्याने येथील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जात नसून येथील रस्ते अद्यापही डांबरी असल्याने पावसाळ्यात येथील रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने या रस्त्यांचा विकास आता मास्टिक अस्फाल्टद्वारे केला जाणार आहे. यासाठी या भागातील रस्त्यांचा विकास मास्टिक अस्फाल्टद्वारे करण्यासाठी 2.60 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. यासाठी व्ही. जे. कार्पोरेशन यांची निवड करण्यात आली असून या कंपनीने उणे 36.99 टक्के दराने बोली लावत काम मिळवले. यासाठी 2.60 कोटी रुपये हे खड्डे तसेच खराब रस्ते दुरुस्त करण्यासाठी खर्च केले जाणार आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/26/bomb-threats-issued-against-the-office-of-the-mayor-of-mumbai-and-the-residence-of-amitabh-bachchan-metro-stations-also-targeted-mumbai-police-on-high-alert/
याबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला असता भाजपच्या प्रिती सात यांनी धारावीतील ज्या रस्त्यांची सुधारणा केली जाणार आहे, त्या रस्त्यांची नावे देण्यात आली नाही. याची लांबी किती आहे, याची पाहणी केली आहे का? पाहणी केली असेल तर त्रूाचा सर्वे अहवाल कुठे आहे.तसेच यासाठभ् 3 कोटी रुपयांचे अंदाज पत्रक कशाच्या आधारावर तयार करण्यात आले याची माहिती देण्यात यावी अशी मागणी केली. तर मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी धारावी विकास हा एसआरएच्या माध्यमातून विशेष प्राधिकरण म्हणून केले जात आहे. त्यामुळे जर धारावीसाठी विशेष प्राधिकरण बनले असेल आणि त्याचा विकास होत असेल, तेथील रस्ते जर ते बनवणार असतील तर मग त्यावरील रस्त्यांवरील खड्डे महापालिकेच्या निधीतून का बुजवले जावेत असा सवाल केला
एमआयएमचे जमीर कुरेशी यांनीही अंदाजित खर्च कशाच्या आधारावर बनवला असे सांगत जर जी उत्तर विभागातील खड्डे नियुक्त केलेल्या दोन संस्थांमार्फत केले गेले तर त्या आता स्वतंत्र निविदा काढल्याने खड्डयांची दुहेरी बिले निघणार नाही का अशी शंका उपस्थित केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ सईदा खान यांनी धारावीसाठी स्वतंत्र निविदा काढण्याची गरज का भासली असा सवाल केला. यशोधर फणसे यांनी 33 टक्के उणे दराने हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. ज्याठिकाणी आपली जबाबदारी नाही तिथेही आपण खर्च करत आहोत असा आरोप केला.यावेळी झालेल्या चर्चेत शितल गंभीर, श्रध्दा जाधव,आदींनी भाग घेतला.
https://www.prahaar.in/2026/11/26/this-is-not-an-india-that-gets-intimidated-this-is-an-india-that-gives-a-fitting-tit-for-tat-response-to-terrorists-deputy-chief-minister-eknath-shinde/
यावेळी प्रशासनाच्यावतीने परिमंडळ दोनमधील धारावीतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचा हा प्रस्ताव आहे. धारावी विकास प्रकल्पासाठी एसआरए हे विशेष नियोजन प्राधिकरण आहे. त्यामुळे सदस्यांच्या भावना रास्त आहेत. त्यामुळे संबंधित प्राधिकरणासोबत पत्रव्यवहार करण्यात आला होता, पण या प्रकल्पाची प्राथमिक प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी कळवले आहे. परंतु याठिकाणी रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात येत नसून केवळ दुरुस्तीचे काम केले जात आहे. यापूर्वी वाकोला उड्डाणपूलावरील खड्डे दुरुस्तीचे कामही महापालिकेने केले होते. त्यामुळे जनतेला दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त् अभिजित बांगर यांनी सांगितले.त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली.