Home महामुंबई Sunday Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; मध्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात बदल

Sunday Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; मध्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात बदल

0
Sunday Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; मध्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात बदल

मुंबई : मुंबईकरांनो, रविवारी (29 नोव्हेंबर) लोकलने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर रेल्वेचे वेळापत्रक आधी तपासा. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यानच्या अप आणि डाउन धीम्या मार्गांवर, तसेच ट्रान्स-हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी/नेरुळदरम्यान असेल. ( Sunday Mega Block)

मुख्य मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत ब्लॉक

सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल.

या काळात सीएसएमटीहून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 दरम्यान सुटणाऱ्या डाउन धीम्या लोकल विद्याविहारपर्यंत जलद मार्गावरून चालवण्यात येतील. या लोकलना भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला येथे थांबे असतील. त्यानंतर त्या विद्याविहार येथे पुन्हा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

घाटकोपरहून सकाळी 10.19 ते दुपारी 3.52 दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या लोकल विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान जलद मार्गावरून धावतील. या लोकल कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा येथे थांबतील.

ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा पाच तास बंद

ठाणे ते वाशी/नेरुळदरम्यान अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत ठाणे ते वाशी, नेरुळ आणि पनवेलदरम्यानच्या ट्रान्स-हार्बर लोकल सेवा बंद राहतील.

ठाण्याहून वाशी, नेरुळ आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाउन लोकल सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07 पर्यंत रद्द असतील. तर पनवेल, नेरुळ आणि वाशीहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या अप लोकल सकाळी 10.25 ते सायंकाळी 4.09 पर्यंत रद्द राहतील.

हार्बर मार्गावरील सेवा नियमित

हार्बर मार्गावरील सीएसएमटी-गोरेगाव आणि सीएसएमटी-पनवेल लोकल तसेच नेरुळ/बेलापूर-उरण मार्गावरील सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार सुरू राहतील.

पायाभूत सुविधांची देखभाल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होणार असल्याने रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here