Vande Bharat Express: भारताचे ‘स्वित्झर्लंड’ म्हणून काश्मीर ओळखले जाते. हिमवृष्टीच्या वेळी काश्मीर अधिकच सुंदर बनते. आणि हे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात यात काही नवीन गोष्ट नाही. अशातच आधुनिक वेगाचे प्रतीक असलेली वंदे भारत ट्रेन जेव्हा काश्मीरच्या सुंदर दऱ्या आणि बर्फाच्छादित प्रदेशातून जाते, तेव्हा ते दृश्य एखाद्या परदेशी पोस्टकार्डपेक्षा कमी नसते. असाच एक बर्फातून जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या क्लिपमध्ये, वंदे भारत एक्सप्रेस नेहमीप्रमाणे रेल्वे रुळांवरून जात आहे, पण ज्या प्रकारे ती रुळांवरील बर्फ उडवून लावते, ते पाहून लोकांना थांबावेच लागते!
केशरी आणि राखाडी रंगाच्या वंदे भारत ट्रेनचा हा मनमोहक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ही ट्रेन पांढऱ्याशुभ्र बर्फातून रुळांवर धावताना दिसत आहे. हे दृश्य पाहून लोक थक्क झाले आहेत आणि अभिमानाने सांगतात की, जरी हे पहिल्या नजरेत स्वित्झर्लंडसारखे दिसत असले तरी, प्रत्यक्षात मात्र हा आपला भारतच आहे.
https://www.prahaar.in/2026/11/27/ramayan-has-overtaken-pushpa-2-now-it-needs-only-11-crore-more-to-break-the-record-of-baahubali-2/
व्हायरल झालेल्या या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये, सुरक्षा जाळ्या आणि बर्फाच्छादित रुळांनी वेढलेली वंदे भारत एक्सप्रेस डोंगराच्या उतारावरून धावताना तिचे हेडलाइट्स चमकताना दिसत आहेत. बर्फ आणि थंड दऱ्यांनी वेढलेल्या या ट्रेनचे दृश्य अत्यंत लक्षवेधी आहे. बर्फामधून प्रवास करत असल्यामुळे पाहणाऱ्यांसाठी एक पर्वणीच ठरली आहे.
Ultimate Beauty..🇮🇳
Not AI, Not Switzerland This is Kashmir https://t.co/OxkEACCrFs
— Amrendra Bahubali 🇮🇳 (@TheBahubali_IND) November 25, 2026
सोशल मीडियावर या क्लिपबद्दल सर्वात मोठी चर्चा म्हणजे, बर्फाच्छादित पर्वत आणि रेल्वे रुळांमधून जाणाऱ्या ट्रेनच्या दृश्यामुळे अनेकांना युरोप किंवा स्वित्झर्लंडची आठवण करून देत आहे. मात्र, जेव्हा लोकांना हे दृश्य काश्मीरच्या खोऱ्यातील असल्याचे समजते, तेव्हा कमेंट्स विभागात अभिमान आणि आनंदाची लाट पसरली. कडाक्याच्या हिवाळ्यात आणि बर्फाळ हवामानात रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि आधुनिक गाड्यांची उपलब्धता हे बदलत्या आणि प्रगतीशील भारताचे प्रतिबिंब आहे, असे लोकांना वाटत आहे.तर काहींनी AI व्हिडिओ असल्याचे बोलत आहेत.