पुणे : पुणे शहरातील अतिक्रमण आणि बेकायदा होर्डिंग्जविरोधात महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा नागरिकांच्या वापरासाठी मोकळ्या असणे आवश्यक आहे. त्यामुळे बेकायदा होर्डिंग्जवर नियमितपणे कारवाई झाली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. ( Illegal Hoardings)
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शहरातील पायाभूत सुविधांचा वापर नागरिकांना योग्य प्रकारे करता आला पाहिजे. वाहनांसाठी रस्ते आणि पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळे असणे गरजेचे आहे. नियम केवळ कागदावर ठेवण्यासाठी नसतात, तर त्यांची अंमलबजावणी करणेही महत्त्वाचे असते. या नियमांचा मुख्य उद्देश सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुखकर करणे हा आहे.
https://www.prahaar.in/2026/11/27/cabinet-approves-bill-for-delimitation-of-constituencies-number-of-seats-to-increase-by-50-percent-across-all-states/
पुणे महापालिकेच्या ‘पुणेरी’ कारवाईचे कौतुक
बेकायदा होर्डिंग्जची समस्या केवळ पुण्यापुरती मर्यादित नसून देशातील अनेक शहरांमध्ये ती दिसून येते. त्यामुळे अशा होर्डिंग्जविरोधात सातत्याने कारवाई होणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. पुणे महापालिका प्रशासनाने यासाठी स्वीकारलेली अभिनव आणि खास ‘पुणेरी’ पद्धत कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, “पुणे प्रशासनाला मी एवढेच सांगेन की, उद्या माझ्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर तुमच्या पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा!” त्यांच्या या विधानाची कार्यक्रमात विशेष चर्चा झाली.
पुण्यात सध्या अतिक्रमणाविरोधात आणि विशेषत: अवैध होर्डिंगविरोधात कारवाई सुरु आहे. मी पुणे महापालिका प्रशासनाचे अतिशय मनापासून कौतूक आणि अभिनंदन करतो.
शहरातील पायाभूत सुविधांचा नागरिकांना योग्य वापर करता आला पाहिजे. वाहनांसाठी, पायी चालण्यासाठी जागा असल्या पाहिजेत. शेवटी नियम हे काही केवळ जीआर किंवा शासकीय दस्तावेजात प्रकाशित करण्यासाठी नसतात, ते पाळायचे सुद्धा असतात. याचा हेतू सर्वसामान्यांचे जीवन सुखकारक करणे हाच असतो…बेकायदेशीर होर्डिंग ही केवळ पुण्यात नाही, सर्वत्रच मोठी समस्या आहे. यावर सातत्याने आणि नियमितपणे कारवाई झालीच पाहिजे. त्यातही पुण्याने जी अभिनव आणि अस्सल ‘पुणेरी’ धाटणीतील संकल्पना स्वीकारली, त्याचे कौतूक करावे तितके कमी आहे. पुणे प्रशासनाला मी सांगेन…. उद्या माझ्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर तुमच्या त्या पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा!
आता येणार्या काळात नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन आहे, तेथेही आता बेकायदेशीर होर्डिंग्जचा धडाका सुरु होईल. नागपूर प्रशासनाने आतापासून जनजागृती करावी आणि शहर विद्रुप होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
नेते असोत की कार्यकर्ते,
ते कायम जनतेतच दिसले पाहिजे,
बेकायदा होर्डिंग्जवर नाही.
#Pune #Nagpur— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 27, 2026
नागपूरमध्येही बेकायदा होर्डिंग्जविरोधात जनजागृती करा
येत्या काळात नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या काळात राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नागपूर महापालिका आणि प्रशासनाने आतापासूनच जनजागृती करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
शहराचे सौंदर्य खराब होणार नाही आणि सार्वजनिक जागांवर बेकायदा होर्डिंग्ज लावली जाणार नाहीत, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. नेते असोत किंवा कार्यकर्ते, त्यांनी जनतेमध्ये दिसले पाहिजे, बेकायदा होर्डिंग्जवर नाही, असा संदेशही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.