Home क्राईम Beed Crime Case: जप्त केलेलं साहित्य परत दिलं नाही म्हणून संतापला! तलाठी कार्यालयात घुसून तलाठ्याला बेदम मारहाण

Beed Crime Case: जप्त केलेलं साहित्य परत दिलं नाही म्हणून संतापला! तलाठी कार्यालयात घुसून तलाठ्याला बेदम मारहाण

0
Beed Crime Case: जप्त केलेलं साहित्य परत दिलं नाही म्हणून संतापला! तलाठी कार्यालयात घुसून तलाठ्याला बेदम मारहाण
AI Generated Image

राज्यात शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात एका वाळूमाफियाने चक्क तलाठी कार्यालयात घुसून तलाठ्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आहेर चिंचोली येथे ही घटना घडली असून, विलास तपसे असे जखमी तलाठ्याचे नाव आहे. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिवसाढवळ्या शासकीय कार्यालयात घुसून अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील आहेर चिंचोली परिसरातून सिंदफणा नदी वाहते. या नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याची माहिती समोर आली होती. याच पार्श्वभूमीवर तलाठी विलास तपसे यांनी काही दिवसांपूर्वी नदीपात्राची पाहणी करून अवैध वाळू उपशासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले होते. या कारवाईमुळे संबंधित व्यक्ती नाराज असल्याचे सांगितले जात आहे.(Talathi Attack)

https://www.prahaar.in/2026/11/27/who-is-responsible-for-the-deaths-of-the-three-students-driver-in-bopdev-ghat-accident-remanded-to-police-custody/

जप्त केलेले साहित्य परत मागितले अन् वाद वाढला

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (25 नोव्हेंबर) दुपारी संबंधित व्यक्ती थेट आहेर चिंचोली येथील तलाठी कार्यालयात दाखल झाली. त्याने तलाठी विलास तपसे यांच्याकडे जप्त केलेले साहित्य परत करण्याची मागणी केली. मात्र, शासकीय कारवाईत जप्त केलेले साहित्य अशा प्रकारे परत देता येणार नसल्याचे तपसे यांनी सांगितले. याच कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या व्यक्तीने हातातील लोखंडी रॉडने तलाठी तपसे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले. शासकीय कार्यालयातच अशा प्रकारची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.(Attack On Govt. Official)

जखमी तलाठ्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार

घटनेची माहिती मिळताच जखमी तलाठी विलास तपसे यांना उपचारासाठी बीड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दखल घेतली आहे. बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी रुग्णालयात जाऊन तपसे यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.(Government Employee Attack)

https://www.prahaar.in/2026/11/27/mohammed-sirajala-dropped-from-playing-11-of-ind-vs-nz-christchurch-test-gurnoor-brarcha-inclusion-instead/

महसूल कर्मचारी संघटना आक्रमक; आंदोलनाचा इशारा

दरम्यान, या घटनेचा महसूल कर्मचारी संघटनेकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारे हल्ले होत असतील, तर त्यांनी काम कसे करायचे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधित आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. तसेच योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.(Talathi Beaten)

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांनाच लक्ष्य केले जात असल्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. आता तर थेट तलाठी कार्यालयात घुसून तलाठ्यावर हल्ला झाल्याने शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कर्तव्य बजावताना अधिकाऱ्यांवर दबाव आणणे आणि त्यांच्यावर हल्ले करणे कितपत योग्य, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे.(Crime News)

या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांनी जखमी तलाठ्यांचा जबाब नोंदवला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित आरोपीवर नेमकी काय कारवाई होते आणि प्रशासन या घटनेची किती गंभीर दखल घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here