चांदवड नगरपरिषदेने कडक पोलीस बंदोबस्तात बाजारपेठ आणि भाजीमंडईचा परिसर अतिक्रमणमुक्त केल्यामुळे शहरातील प्रस्तावित शिवस्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे. या धडक मोहिमेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शिवस्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला आता लवकरच गती मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
नगरपरिषद प्रशासनाने आज बाजारपेठेतील नियोजित शिवस्मारकाच्या जागेसह संपूर्ण भाजीमंडई परिसरातील अतिक्रमणे हटवून जागा पूर्णपणे मोकळी केली. या विशेष मोहिमेत नगरपरिषदेचे सर्वच अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
https://www.prahaar.in/2026/11/27/nashik-crimefiring-incident-using-a-country-made-pistol-in-broad-daylight-in-niphad-33-year-old-man-critically-injured/
बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणी भव्य शिवस्मारक साकारले जाणार असून, त्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून देणे गरजेचे होते. प्रशासनाच्या या निर्णायक कारवाईमुळे स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून, स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.