Home महत्वाची बातमी Amrit Drone Mission : आदिवासी तरुणांसाठी ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी, ‘अमृत ड्रोन मिशन’मध्ये सहभागाचे आवाहन

Amrit Drone Mission : आदिवासी तरुणांसाठी ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी, ‘अमृत ड्रोन मिशन’मध्ये सहभागाचे आवाहन

0
Amrit Drone Mission : आदिवासी तरुणांसाठी ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी, ‘अमृत ड्रोन मिशन’मध्ये सहभागाचे आवाहन

Amrit Drone Mission : शेतीपासून उद्योग क्षेत्रापर्यंत सध्या ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच आता आदिवासी युवक-युवतींसाठी ड्रोन पायलट बनण्याची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात ‘अमृत’ आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच टीआरटीआय यांच्यात यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

या करारामुळे अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र युवक-युवतींनाही आता अमृतच्या ‘अमृत ड्रोन मिशन’ अंतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षण घेता येणार आहे. या प्रशिक्षणात ड्रोन तंत्रज्ञानाचे सैद्धांतिक ज्ञान, प्रत्यक्ष उड्डाणाचे प्रात्यक्षिक आणि व्यावसायिक कौशल्ये शिकवली जाणार आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/27/dwarka-circle-to-get-relief-from-traffic-congestion-80-percent-of-work-on-dwarka-interchange-completed/

विशेष म्हणजे, शेतीमध्ये कीटकनाशकांची फवारणी, पिकांचे निरीक्षण, जमिनीचे सर्वेक्षण आणि मॅपिंग अशा विविध कामांसाठी ड्रोनचा वापर वाढत आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच स्वतःचा ड्रोन सेवा व्यवसाय सुरू करून स्वयंरोजगाराचा मार्गही खुला होणार आहे. (Amrit Drone Mission)

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. दरम्यान, प्रशिक्षणासाठी जागा मर्यादित असल्याने अनुसूचित जमाती प्रवर्गातील इच्छुक आणि पात्र युवक-युवतींनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतचे विभागीय व्यवस्थापन मंगेश खाडीलकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here