Oscars 2027 : भारतीय चित्रपट ‘गोंधळ’ आणि ‘अंग’ यांनी ऑस्कर 2027 च्या शर्यतीत प्रवेश केला आहे. ‘गोंधळ’ला आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे. या दोन्ही चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे ते भारताच्या विविध प्रदेशांची संस्कृती पडद्यावर सादर करणारे आहेत.
भारतीय चित्रपटसृष्टीला जगभरात मिळणारी ओळख सातत्याने वाढत आहे. त्यात आता पुन्हा एकदा दोन भारतीय चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली उपस्थिती नोंदवून प्रतिनिधीत्व केलं आहे. 99 व्या अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर 2027 च्या शर्यतीत या 2 चित्रपटांनी स्थान निर्माण केले आहे.
अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने ‘आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म’, ‘ॲनिमेटेड फीचर फिल्म’ आणि ‘डॉक्युमेंटरी फीचर फिल्म’ या श्रेणींमध्ये विचारार्थ पात्र ठरलेल्या चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये भारताचा ‘गोंधळ’ हा ‘आंतरराष्ट्रीय फीचर’ श्रेणीतील 104 चित्रपटांपैकी एक आहे. ‘डॉक्युमेंटरी’ श्रेणीमध्ये 190 पात्र चित्रपट आहेत, तर ‘ॲनिमेटेड फीचर’च्या यादीत 38 चित्रपटांचा समावेश आहे. ‘आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म’ श्रेणीमध्ये एकूण 104 चित्रपट पात्र ठरले आहेत, जी आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.
https://www.prahaar.in/2026/11/27/solapur-dcc-bank-election-bjp-secures-a-landslide-victory-in-the-solapur-district-bank-the-bjp-led-panel-wins-18-out-of-19-seats/
थेजा रिओच्या ‘अँग’ची निवड
चित्रपट दिग्दर्शिका थेजा रिओच्या ‘अँग’ने टोरोंटो या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘प्लॅटफॉर्म अवॉर्ड’ जिंकून शर्यतीत आपले स्थान निश्चित केले आहे. यासाठी विविध देश आणि प्रदेशांमधून 100चित्रपट सादर करण्यात आले होते. कान्स चित्रपट महोत्सवात ‘पाल्म डी’ओर’ जिंकलेला रोमानियाचा ‘फ्योर्ड’ या यादीचा भाग आहे. तर भारताचा ‘गोंधळ‘ जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी आणि दक्षिण कोरियासारख्या देशांतील चित्रपटांशी स्पर्धा करताना दिसणार आहे.
कोणते इतर चित्रपट समाविष्ट आहेत?
आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत जपानचा ‘ऑल ऑफ अ सडन’, नेपाळचा ‘एलिफंट्स इन द फॉग’, पोलंडचा ‘फादरलँड’, रोमानियाचा ‘फ्योर्ड’, स्पेनचा ‘ला बोला नेग्रा’, फ्रान्सचा ‘मिनोटॉर’, दक्षिण कोरियाचा ‘पॉसिबल लव्ह’, युनायटेड किंगडमचा ‘रिहर्सल्स फॉर अ रिव्होल्यूशन’ आणि पाकिस्तानचा ‘हँगिंग बाय अ वायर’ या चित्रपटांचा समावेश आहे.
‘गोंधळ’ आणि ‘आंग’ या दोन्ही चित्रपटांचा पात्रता यादीत समावेश झाल्यामुळे ते आता मतदानाच्या प्राथमिक फेरीत सहभागी होऊ शकतात. त्यानंतर अकादमी अंतिम निवड यादी जाहीर करेल, ज्यानंतर अंतिम नामांकने निश्चित केली जातील.
ग्रामीण महाराष्ट्रात घडणारी ‘गोंधळ’ ही कथा एका रात्रीतील घटनांचे चित्रण करते. या चित्रपटाची कथा मध्यरात्री होणाऱ्या पारंपरिक ‘गोंधळ’ विधीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. हा चित्रपट आपल्या कथानकात संगीत, नृत्य, पौराणिक कथा आणि धार्मिक परंपरा यांचा मेळ घालतो. या पारंपरिक सोहळ्यात संगीत, नृत्य, पौराणिक कथा आणि धार्मिक श्रद्धा यांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. हा चित्रपट या सर्व पैलूंना आपल्या कथानकात गुंफतो. यामुळे ही केवळ एक चित्रपट कथा न राहता, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरांची एक झलकही ठरते.