Home देश Paternity Leave : आता पुरुषांनाही मिळणार 15 दिवसांची पितृत्व रजा! सरकारचा मोठा निर्णय

Paternity Leave : आता पुरुषांनाही मिळणार 15 दिवसांची पितृत्व रजा! सरकारचा मोठा निर्णय

0
Paternity Leave : आता पुरुषांनाही मिळणार 15 दिवसांची पितृत्व रजा! सरकारचा मोठा निर्णय
Photo : Pinterest

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी गुरुवारी (२६ नोव्हेंबर) पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांना १५ दिवसांच्या पितृत्व रजेची घोषणा केली आहे. उत्तम पालकत्वासाठी पुरुषांना असा हक्क देण्याची राज्यात ही पहिलीच वेळ आहे. मुलांची काळजी घेणे ही पुरुषांचीही जबाबदारी आणि कर्तव्य आहे आणि त्यानुसार विवाहित पुरुषांना १५ दिवसांची पितृत्व रजा मिळू शकेल, असे सरकारने म्हटले आहे. पुरुषांसाठी नवीन रजा सुविधा लागू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून ही १५ दिवसांची रजा एकतर बाळंतपणाच्या १५ दिवस आधी किंवा बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यांच्या आत घेता येईल, असे एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

https://www.prahaar.in/2026/11/26/australian-senate-viral-video-fatima-payman-baby-speech-hp/

सरकारने सांगितल्यानुसार पुरुषांना पितृत्व रजेची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवेदनानंतर हा निर्णय घेण्यात आला असून त्यावर सकारात्मक विचार करण्यात आला आहे. तामिळनाडू सरकारमध्ये कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना सध्या ३६५ दिवसांची प्रसूती रजा दिली जात असताना सरकारी कर्मचाऱ्यांच्या विनंतीनंतर सरकारने पुरुष कर्मचाऱ्यांसाठी पितृत्व रजा सुरू केली आहे. महिला सरकारी कर्मचाऱ्यांना ३६५ दिवसांची प्रसूती रजा देण्याची तरतूद ही मातृत्व आणि बालकाच्या कल्याणला दिले जाणारे महत्त्व दर्शवते, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्याचप्रमाणे, पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांना पितृत्व रजा दिल्यास त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या वाटून घेण्यास मदत होईल आणि मुलाच्या संगोपनात वडिलांचा सहभाग सुनिश्चित होईल, असेही त्यात नमूद केले आहे.

‘या काळात आईला शारीरिक आणि भावनिक आधार देण्यासाठी तसेच बाळाची काळजी घेण्यासाठी वडिलांचा पाठिंबा अत्यावश्यक असतो. पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांना पितृत्व रजा दिल्यास कौटुंबिक जबाबदाऱ्या वाटून घेण्यास मदत होईल आणि मुलांच्या संगोपनात वडिलांचा सहभाग सुनिश्चित होईल,’ असे मुख्यमंत्री सी जोसेफ म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here