Home क्रीडा क्रीजवर कोणीच नाही, तरीही बॉल टाकला अन् फलंदाज OUT! क्रिकेटमधील हा अजब नियम तुम्हाला माहिती आहे का? VIDEO

क्रीजवर कोणीच नाही, तरीही बॉल टाकला अन् फलंदाज OUT! क्रिकेटमधील हा अजब नियम तुम्हाला माहिती आहे का? VIDEO

0
क्रीजवर कोणीच नाही, तरीही बॉल टाकला अन् फलंदाज OUT! क्रिकेटमधील हा अजब नियम तुम्हाला माहिती आहे का? VIDEO
क्रीजवर कोणीच नाही, तरीही बॉल टाकला अन् फलंदाज OUT! क्रिकेटमधील हा अजब नियम तुम्हाला माहिती आहे का? (Photo: Video Grab)

वुमन्स बिग बॅश लीग 2026 स्पर्धेतील 33 व्या सामन्यात मेलबर्न रेनेगेड्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यात लढत झाली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा ब्रिस्बेन हीटच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. ब्रिस्बेन हीटने 20 षटकात 8 गडी गमवून 137 धावा केल्या. तसेच विजयासाठी 138 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान मेलबर्न रेनेगेड्सने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. या सामन्यात एक विकेट विचित्र पद्धतीने पडली. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये चर्चांना उधाण आहे. कारण विजयी धावांचा पाठलाग करताना ब्रिस्बेन रेनेगेड्सची स्थिती 3 बाद 97 धावा अशी होती. जॉर्जिया वेअरहॅमला सारा ग्लेनने बाद केल्यानंतर डॉटिन मैदानात आली. पण तिला एकही चेंडू न खेळता त्रिफळाचीत होत मैदान सोडावं लागलं. डॉटिन ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ घेतला. त्यामुळे सारा ग्लेनने तिला बाद करण्यापूर्वी ती विकेटपासून पाच मीटर अंतरावर उभी होती.

मेलबर्नच्या डावाचे 15वं षटक सुरू होतं आणि जॉर्जिया वेअरहॅम पहिल्याच चेंडूवर बाद झाली. यानंतर डॉटिन क्रीजवर येणार होती. पण ती 75 सेकंदांच्या आत स्ट्राईक घेऊ शकली नाही आणि तिला मागे उभे राहावे लागले. साराने थेट यष्टींवर नेम धरला आणि बेल्स उडवल्या. यामुळे, एकही चेंडू न खेळता डॉटिन क्लीन बोल्ड झाली. बिग बॅश लीगच्या नियमांनुसार, फलंदाज बाद झाल्यानंतर पुढील चेंडू खेळण्यासाठी नव्या फलंदाजाला 75 सेकंदांत सज्ज होणे बंधनकारक असते. पण लीगच्या नियमानुसार, ‘टाइम्ड आऊट’ नियमात एक विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार फलंदाजाला चेंडू न खेळता बाजूला उभे राहावे लागते आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजाला थेट यष्ट्यांवर ‘फ्री बॉल’ टाकण्याची संधी मिळते. सारा ग्लेनने या संधीचा अचूक फायदा घेत आपल्या मोफत चेंडूवर यष्ट्यांचा वेध घेतला आणि डॉटिनला एकही चेंडू न खेळता बाद केले.

https://www.prahaar.in/2026/11/26/kane-williamson-appointed-head-coach-of-durbans-super-giants-new-innings-in-sa20-2027/

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील टाइम आऊटची घटना वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये घडली होती. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूज वेळेत मैदानात पोहोचला नाही म्हणून बाद दिलं गेलं. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रिकाम्या यष्टींवर गोलंदाजी करण्याचा कोणताही नियम नाही. पण लीगमध्ये टाइम्ड आऊट हा नियम 2021-22 च्या हंगामात लागू झाला. पण यापूर्वी कधीही त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. पण डॉटीनच्या माध्यमातून पहिल्यांदाच असा प्रकार क्रीडाप्रेमींना पाहता आला.

दोन्ही संघांचे खेळाडू

ब्रिस्बेन हीट (Playing XI): ग्रेस हॅरिस, चार्ली नॉट, जॉर्जिया रेडमेन (यष्टिरक्षक/कर्णधार), यास्तिका भाटिया, ओर्ला प्रेंडरगास्ट, लुसी हॅमिल्टन, सियाना जिंजर, लुसिंडा बर्क, मिकायला रिग्ली, सारा ग्लेन, लिली बासिंगथवेट.

मेलबर्न रेनेगेड्स वुमन (Playing XI): टेस फ्लिंटॉफ, हेली मॅथ्यूज, कोर्टनी वेब, सोफी मोलिन्यूक्स (कर्णधार), ॲनी विकमन, जॉर्जिया वेअरहॅम, निकोल फाल्टम (यष्टिरक्षक), क्लो ट्रायॉन, डिआंड्रा डॉटिन, मिली इलिंगवर्थ, टायला व्लामिंक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here