Home महाराष्ट्र नाशिक Nashik : दुष्काळी मदतीचे पैसे आले का ? नाशिकच्या 4.49 लाख शेतकऱ्यांना लाभ

Nashik : दुष्काळी मदतीचे पैसे आले का ? नाशिकच्या 4.49 लाख शेतकऱ्यांना लाभ

0
Nashik : दुष्काळी मदतीचे पैसे आले का ? नाशिकच्या 4.49 लाख शेतकऱ्यांना लाभ

नाशिक :  दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळी मदत अग्रीमअंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ४९ हजार ५७३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर प्रत्येकी ५ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण २२४ कोटी ७८ लाख ६५ हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रक्रिया सुरू आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी दुष्काळी मदत अग्रीम जाहीर केले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत लवकर पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये मदत वितरणाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

कोणत्या तालुक्यात किती शेतकऱ्यांना मिळाली मदत ?

जिल्ह्यातील तालुकानिहाय मदतीची आकडेवारी पाहिली तर मालेगाव तालुक्यात सर्वाधिक ७२ हजार ३६३ शेतकऱ्यांना ३६ कोटी १८ लाख १५ हजार रुपयांची मदत मिळाली आहे. त्यानंतर निफाड तालुक्यातील ५६ हजार २९६ शेतकऱ्यांना २८ कोटी १४ लाख ८० हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. बागलाणमधील ५२ हजार ६६७, येवल्यातील ५१ हजार ६३९, सिन्नरमधील ४७ हजार ९५५, चांदवडमधील ३८ हजार ४०८ आणि नांदगावमधील ३६ हजार २०३ शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. याशिवाय देवळा, इगतपुरी, कळवण, पेठ, सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांच्याही खात्यांवर मदत जमा करण्यात आली आहे.

https://www.prahaar.in/2026/11/26/lured-by-the-promise-of-500x-margin-and-tax-free-trading-an-investor-from-nashik-gets-swindled-out-of-5-lakh-online/

मदत मिळवण्यासाठी आधार लिंक आणि फार्मर आयडी आवश्यक

दरम्यान, ज्या पात्र शेतकऱ्यांना अद्याप मदतीची रक्कम मिळालेली नाही, त्यांनी काही महत्त्वाच्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे. तसेच फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घेणेही आवश्यक आहे. आधार लिंक नसणे, बँक खात्यातील त्रुटी किंवा फार्मर आयडी उपलब्ध नसणे यामुळे मदत वितरणात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली बँक खातेविषयक माहिती तपासून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

उर्वरित शेतकऱ्यांनाही मिळणार मदत

जिल्ह्यातील ज्या पात्र शेतकऱ्यांना अद्याप दुष्काळी मदत मिळालेली नाही, त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. तांत्रिक अडचणी किंवा कागदपत्रांमधील त्रुटींमुळे कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना अद्याप ५ हजार रुपयांची दुष्काळी मदत मिळालेली नाही, त्यांनी बँक खाते आधारशी लिंक करून फार्मर आयडी तयार करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here