Home Uncategorized विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा! दहावी- बारावीची परीक्षा कॉपीमुक्त करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे निर्देश

विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा! दहावी- बारावीची परीक्षा कॉपीमुक्त करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे निर्देश

0
विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा! दहावी- बारावीची परीक्षा कॉपीमुक्त करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे निर्देश
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई: राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेसाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. फेब्रुवारी आणि मार्च 2027 मध्ये होणाऱ्या बोर्डाची परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि तणावमुक्त करण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाकडून काटेकोरपणे नियोजन केले जात आहे. मंत्रालयामध्ये काल झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीमध्ये राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सर्व यंत्रणांना नियोजन काटेकोरपणे राबवण्याचे सक्त आदेश दिले आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/25/after-pune-now-a-shooting-in-mumbai-unidentified-assailants-open-fire-at-a-jewellery-shop-in-mahim/

राज्य शासनाच्या निर्णयानुसार दुष्काळग्रस्त घोषित 310 तालुक्यांतील दहावी आणि बारावीच्या आतापर्यंत अर्ज केलेल्या 15 लाख 28 हजार 627 विद्यार्थ्यांची अंदाजे 96 कोटी 27 लाख रुपयांची परीक्षा शुल्कमाफी करण्यात आली आहे. यामध्ये दहावीच्या 8 लाख 52 हजार 496 तर बारावीच्या 6 लाख 76 हजार 131 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ज्या पात्र विद्यार्थ्यांनी यापूर्वीच शुल्क भरले आहे, त्यांना परतावा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नियमित शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2026 पर्यंतची असणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेळापत्रकानुसार:

  • बारावी लेखी परीक्षा- 8 फेब्रुवारी ते 18 मार्च 2027
  • दहावी लेखी परीक्षा- 15 फेब्रुवारी ते 15 मार्च 2027
  • प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2027
  • निकाल- दोन्ही परीक्षांचे निकाल एप्रिल 2027 च्या अखेरपर्यंत जाहीर करण्याचे नियोजन आहे. सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

https://www.prahaar.in/2026/11/25/even-after-18-years-that-fateful-night-cannot-be-forgotten-untold-stories-from-the-26-11-attacks-and-memories-of-the-martyrs/

ड्रोन, सीसीटीव्ही आणि कॉपीमुक्त अभियान

परीक्षेच्या दरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी यंदा विशेष कडक पावले उचलण्यात आली आहेत. बारावीच्या परिक्षेवेळी 3 हजार 332 आणि दहावीच्या परिक्षेवेळी 4 हजार 997 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेसाठी बारावीसाठी 506 आणि दहावीसाठी 525 परिरक्षक केंद्रांवर 24 तास पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही राहणार आहेत. संवेदनशील केंद्रांवर भरारी पथके, बैठी पथके आणि आवश्यकतेनुसार ड्रोनद्वारे करडी नजर ठेवली जाईल. शिवाय, परिक्षेच्या काळामध्ये, परीक्षा केंद्रांच्या 500 मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्रे परीक्षा काळात बंद ठेवण्यात येतील. जानेवारी 2027 मध्ये शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जनजागृती सप्ताहही राबवला जाणार आहे.

https://www.prahaar.in/2026/11/25/ghal-bharni-filling-of-the-dam-gap-closure-of-the-dam-breach-for-the-naradve-project-in-kankavli-to-take-place-soon-minister-nitesh-rane/

डिजिटल मूल्यमापन आणि विद्यार्थ्यांचे समुपदेशन

प्रश्नपत्रिकांचे सुरक्षित डिजिटल वितरण, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग आणि डिजिटल मूल्यमापनावर भर दिला जात आहे. तसेच राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखड्यातील निवडक विषयांच्या उत्तरपत्रिकांचे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने मूल्यमापन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी मंडळाचे 10 आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे 300 समुपदेशक उपलब्ध असतील. याशिवाय ‘टेली मानस’ (14416) आणि ‘मनोदर्पण’ (8448440632) हेल्पलाइनद्वारेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here