Home महाराष्ट्र नवी मुंबई Navi Mumbai water cut news : नवी मुंबईकरांनो सावधान! उद्या १२ तास पाणी बंद; शनिवारीही कमी दाबाने पाणी!

Navi Mumbai water cut news : नवी मुंबईकरांनो सावधान! उद्या १२ तास पाणी बंद; शनिवारीही कमी दाबाने पाणी!

0
Navi Mumbai water cut news : नवी मुंबईकरांनो सावधान! उद्या १२ तास पाणी बंद; शनिवारीही कमी दाबाने पाणी!

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील रहिवाशांना उद्या, शुक्रवार २७ नोव्हेंबर रोजी पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. बेलापूरपासून ऐरोलीपर्यंत जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर नवीन ‘फ्लो मीटर’ आणि ‘व्हॉल्व्ह’ बसवण्याचे महत्त्वाचे काम पालिकेकडून केले जाणार आहे. या तांत्रिक कामामुळे शहरातील पाणीपुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद

महापालिकेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत एकूण १२ तास पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील. या शटडाऊनमुळे बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या प्रमुख विभागांतील पाणीपुरवठा खंडित होईल. तसेच, मुख्य जलवाहिनीवरून थेट पाणीपुरवठा होणाऱ्या जोडण्यांसह सिडकोच्या खारघर आणि कामोठे परिसरातही पाणी येणार नाही. या दुरुस्तीच्या कामामुळे शुक्रवारी, २७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सत्रात पाणीपुरवठा होणार नाही. त्यानंतर शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी आणि संध्याकाळी अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवले जाईल, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित भागांतील नागरिकांनी आगाऊ पाणी साठवून ठेवावे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

https://www.prahaar.in/2026/11/26/australian-senate-viral-video-fatima-payman-baby-speech-hp/

सिडकोच्या हद्दीत पाणीकपातीचे नियम आधीच लागू

दुसरीकडे, राज्यात निर्माण होऊ शकणारी पाणीटंचाई लक्षात घेता सिडकोने २ नोव्हेंबरपासूनच आपल्या सर्व विभागांमध्ये १५ टक्के पाणीकपात सुरू केली आहे. या नियोजनांतर्गत विविध नोड्समध्ये आठवड्यातून एक दिवस पूर्ण २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. याशिवाय उलवे आणि द्रोणागिरी भागातील काही वसाहतींना एक दिवसाआड पाणी दिले जात आहे. पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी सिडकोने पाण्याच्या वापरावर नियंत्रण आणले आहे.

शासन निर्णयानुसार जलव्यवस्थापनाची अंमलबजावणी

महाराष्ट्र सरकारने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार (GR), सर्व संबंधित यंत्रणांना ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य आणि प्राधान्याने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारच्या याच निर्देशांचे पालन करत पाण्याची बचत आणि योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ही पावले उचलली जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here