एसीसी मेन्स आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत ए आणि श्रीलंका ए यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात विजेत्या संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि कर्णधार तिलक वर्मा याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडिया ए संघाचा कर्णधार तिलक वर्मा म्हणाला की, ‘आम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. सर्वप्रथम, वैभवने एक जबरदस्त खेळी केली. त्याच वेळी, हा एक नवीन दिवस आणि नवीन सामना आहे. आम्ही या सामन्यावर लक्ष केंद्रित करून चांगली कामगिरी करणे महत्त्वाचे आहे. दुसऱ्या मैदानापेक्षा ही खेळपट्टी दुसऱ्या डावात वेगळी वागते. दुसऱ्या डावात फलंदाजी करणे थोडे अधिक कठीण असते. एक बदल संघात केला आहे. प्रभसिमरनच्या जागी तनुष कोटियन पदार्पणाचा सामना खेळत आहे.’
काय म्हणाला श्रीलंकेचा कर्णधार?
श्रीलंका ए संघाचा कर्णधार पवन रत्नायकेला प्रथम फलंदाजी करायची होती? हा प्रश्न विचारल्यानंतर म्हणाला की, ‘हो, मला वाटतं ते अधिक चांगलं आहे . पण मला वाटतं आम्ही गोलंदाजी करायचं ठरवलं असतं. आम्ही या खेळपट्टीवर यापूर्वी खेळलो आहोत. मला वाटतं या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणं अधिक सोयीचं आहे. आमच्या संघात एक बदल आहे – दुलाज बाहेर गेला आहे आणि गरुका संघात आला आहे.’ दरम्यान, भारताकडून अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी मैदानात उतरली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आक्रमक खेळीची अपेक्षा क्रीडाप्रेमींना आहे.मागच्या सामन्यात अवघ्या 52 चेंडूत वैभव सूर्यवंशीने द्विशतक ठोकलं होतं. त्यात 28 षटकारांचा समावेश आहे.
https://www.prahaar.in/2026/11/26/no-one-at-the-crease-yet-the-ball-is-bowled-and-the-batter-is-out-do-you-know-about-this-bizarre-rule-in-wbbl-cricket-watch-video/
दोन्ही संघांची प्लेइंग 11
श्रीलंका ए संघ : लसिथ क्रूसपुल्ले, सिनेथ जयवर्धने, निशान मदुष्का (यष्टिरक्षक), पवन रथनायके (कर्णधार), निपुन धनंजया, जनिथ लियानागे, रविंदू फर्नांडो, वनुजा सहन, विजयकांत व्यासकांत, लाहिरू समरकून, गरुका संकेथ.
भारत ए संघ : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा (कर्णधार), कुमार कुशाग्र (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, शाहबाज अहमद, सूर्यांश शेडगे, तनुष कोटियन, हर्ष दुबे, हर्षित राणा, अर्शद खान.