Home क्रीडा IND vs NZ: क्राइस्टचर्च कसोटीपूर्वी टीम इंडियाने सराव केला रद्द, कारण असं की…

IND vs NZ: क्राइस्टचर्च कसोटीपूर्वी टीम इंडियाने सराव केला रद्द, कारण असं की…

0
IND vs NZ: क्राइस्टचर्च कसोटीपूर्वी टीम इंडियाने सराव केला रद्द, कारण असं की…
IND vs NZ: क्राइस्टचर्च कसोटीपूर्वी टीम इंडियाने सराव केला रद्द, कारण असं की... (Photo: BCCI Twitter)

भारत न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित ठरला. त्यामुळे दुसरा आणि शेवटचा सामना निर्णायक ठरणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी हा विजय महत्त्वाचा आहे. असं असताना भारतीय संघाकडून फार अपेक्षा आहेत. दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्च येथे खेळला जाणार आहे. हा सामना 27 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी होणारा सराव रद्द करण्यात आला आहे. 25 नोव्हेंबरला होणारा सराव झाला नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत. इतका महत्त्वाचा सामना असताना त्यापूर्वी होणार सराव का रद्द केला? यामागे काही कारण आहे का? असे एक ना अनेक प्रश्न क्रीडाप्रेमींच्या मनात घर करून आहेत. तर या मागचं प्रमुख कारण म्हणजे खेळाडूंची रिकव्हरी… भारतीय संघ व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. जेणेकरून खेळाडू फिट अँड फाईन राहतील आणि दुसऱ्या कसोटीसाठी ताजेतवाने राहतील.

आराम मिळावा म्हणून…

भारत न्यूझीलंड मालिकेतील पहिला सामना पार पडल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी दुसरा कसोटी सामना होणार आहे. त्यामुळे खेळाडूंना आराम करण्यासाठी पुरेसा अवधी मिळालेला नाही. त्यात पहिला कसोटी सामना पाच दिवस खेळून काढला. भारतीय गोलंदाजांनी चौथ्या आणि पाचव्या दिवशी गोलंदाजी केली. त्यामुळे खेळाडू खूपच थकले होते. त्यात भारतीय संघ वेलिंग्टनहून क्राइस्टचर्च येथे पोहोचला आहे. त्यामुळे शाररिक आणि मानसिक थकवा आहे.थकवा आणि किरकोळ दुखापतींवर उपाय म्हणून भारतीय संघाने सराव टाळला. दुसरीकडे, भारतीय संघाने सराव टाळला असला तरी न्यूझीलंडने संधी साधली. 25 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंडच्या खेळाडूंनी क्राइस्टचर्च येथे सराव केला. या सराव सत्रादरम्यान मॅट हेनरी याने पत्रकार परिषद घेतली.

https://www.prahaar.in/2026/11/24/ipl-2027-paras-mhambrey-set-to-become-punjab-kings-bowling-coach-developments-gain-momentum-ahead-of-the-mini-auction/

न्यूझीलंडच्या खेळाडूंनीही वेलिंग्टन मैदानात पाच दिवस घालवले. न्यूझीलंडचे खेळाडूही थकले असतील, यात काही शंका नाही. पण त्यांनी सराव केला आणि टीम इंडियाने का नाही? अशीही चर्चा क्रीडावर्तुळात रंगली आहे. कसोटी मालिका सध्या बरोबरीत आहे. वेलिंग्टन कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय संघासाठी क्राइस्टचर्च कसोटीतील विजय निर्णायक आहे. हा विजय केवळ मालिका जिंकण्यासाठीच नव्हे, तर डब्ल्यूटीसी अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारताच्या आशांसाठीही महत्त्वाचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here