साप्ताहिक भविष्य, २२ नोव्हेंबर २०२६ ते २९ नोव्हेंबर २०२६
![]() |
सकारात्मक घटना घडतीलमेष : एकंदरीत हा आठवडा शुभ फळे देईल. शुभ ग्रहमानामुळे आजूबाजूला सकारात्मक घटना घडतील. प्रवासाचे योग आहेत. प्रवासात काही मान्यवरांच्या ओळखी होतील नवे परिचय होतील ते आपल्यासाठी भविष्यात उपयुक्त सिद्ध होते. तसेच समाजातील मान्यवरांच्या व मोठ्या लोकांच्या सहवासात राहावयास मिळेल त्यांचे मार्गदर्शन लाभले. वेळ प्रसंगी मदतही मिळेल. आपले विचार सकारात्मक राहतील त्यामुळे आपल्या आपल्या सकारात्मक कृतीही घडेल कुटुंब परिवार विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह विषयी बोलणे प्रगतीपथावर असतील काहींचे परिचयोत्तर विवाह ठरतील. |
![]() |
नवीन करारमदार होऊ शकतातवृषभ : व्यवसाय धंद्यात परिस्थिती उत्तम राहून उलाढाल वाढेल. व्यवसायातील नव्या संकल्पनांचा केलेला वापर फलद्रूप ठरेल नवीन तंत्रज्ञान ही वापरू शकाल. व्यवसायिक नवीन करारमदार होऊ शकतात काही फायद्याची सौदे हाती येतील. गेल्या काही दिवसात व्यवसायात आलेली मरगळ जाऊन नवजीवन प्राप्त होईल. जुनी येणे वसूल होतील व्यवसायाची घडी नीट बसवू शकाल व्यवसाय धंद्यातील जुनी नाती नव्याने प्रस्थापित होतील. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे भाग्योदय होतील. गाठी भेटीतून विवाह सारख्या गोष्टी ठरतील . |
![]() |
यश मिळू शकतेमिथुन : व्यवसाय-धंद्यात नोकरीत समाधान कारक परिस्थिती राहील. नोकरीविषयक दिलेल्या जुन्या मुलाखती यशस्वी झालेल्या दिसून नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते. त्याच प्रमाणे चालू नोकरी बदलून चांगले पॅकेजची दुसरी नोकरी शोधण्यात प्रयत्न केल्यास यश मिळू शकते. ओळखींचा उपयोग होऊ शकतो. चालू नोकरीत पदोन्नती व वेतन वृद्धि ही मिळण्याची शक्यता आहे मात्र बदली ची तयारी ठेवावी लागेल. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधान कारक राहिल्यामुळे आर्थिक चणचण पूर्वीसारखी जाणवणार नाही. कामगारांचे सहकार्य लाभेल. |
![]() |
सुख सुविधांमध्ये वृद्धि होईलकर्क : आपली आर्थिक परिस्थिती मजबूत राहिल्याने आपण बघितलेले स्वतःच्या घराचे स्वप्न फलद्रूप होऊ शकेल त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास त्या प्रयत्नांना निश्चितच यश प्राप्त होईल पैशाची सोय होईल. राहत्या घरासाठी खर्च कराल. तसेच घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च होईल. भौतिक सुख सुविधांमध्ये वृद्धि होईल. गृहसौख्य मिळून कुटुंबातील मुला मुलींकडून मनास आनंद देणाऱ्या वार्ता मिळतील. तरुण-तरुणींचे समस्या अथवा प्रश्न सुटतील. नोकरीविषयक कामे होतील आपले जुने वाहन बदलून नवीन वाहन खरेदी करू शकाल. प्रलंबित राहिलेली सरकारी कामे पूर्ण करता येतील. |
![]() |
महत्वकांक्षा पूर्ण होईलसिंह :अनुकूल ग्रहमान लाभल्यामुळे सर्वकष यश मिळेल. नोकरीमध्ये आपण आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचे फळ मिळेल वेतन वृद्धि पदोन्नती सारख्या घटना घटित होतील. वरिष्ठांच्या बरोबर असलेले संबंध अधिक दृढ होतील. मात्र आपल्या कामात आपण अद्यावत राहणे गरजेचे आहे. तसेच इतर कोणावरही शेरेबाजी टाळा. बरेच दिवस मनात असलेली एखादी महत्वकांक्षा पूर्ण होईल. कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. विद्यार्थ्यांचे परदेशगमनाचे स्वप्न साकार होऊ शकते त्यामध्ये कुटुंबीयांची मदत मिळेल तसेच गुरुजनांचे आशीर्वाद व मार्गदर्शन लाभेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहून आरोग्यही चांगले राहील. |
![]() |
चांगल्या वार्ता मिळतीलकन्या : दीर्घकालीन प्रलंबित असलेले कोर्ट कचेरीतील कामे गतिशील होतील. दावे जे दाखल केले होते त्यांचा निकाल आपल्या बाजूने लागेल. सुटकेचा निश्वास सोडाल. जमीन जुमला स्थायी संपत्ती या विषयी असलेले वाद-विवाद शमून सर्वमान्य तोडगा निघेल या कामात कुटुंबातील जेष्ठ मंडळींचा सहभाग असू शकतो. कुटुंब परिवारात वातावरण उत्तम राहून आपल्याला कुटुंबातील इतर सदस्यांचे सहकार्य लाभेल विशेषतः जीवनसाथी चे सहकार्य सर्व बाबतीत आपल्याला लाभलेले दिसून येईल मुलांकडून चांगल्या वार्ता मिळतील. |
![]() |
शुभ कार्य घडेलतूळ : बदलत्या ग्रहमाला नुसार आपल्या आजूबाजूच्या वातावरणातील फरक आपल्याला जाणवेल तापर्यंत जी कामे बर्याच प्रयत्नांनी होत नव्हती ती आता साध्या प्रयत्नांनी झाल्याने आश्चर्यचकित व्हाल तरुणांना त्यांच्या उपक्रमातून यश मिळेल. विशिष्ट चिंता मिटतील. ताण तणाव मुक्त वातावरणाचा लाभ मिळेल. घरामधील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. कुटुंब परिवारात शुभ कार्य घडेल. प्रेमात यश संपादन करता येईल मात्र जरा जपून राहणे हितकारक ठरेल. नोकरी-व्यवसायात तसेच धंद्यात काही मोठे फायद्याचे सौदे हाती येण्याची शक्यता आहे नवीन करारमदार होतील. |
![]() |
यश मिळेलवृश्चिक : आज पर्यंत जी प्राप्त परिस्थिती आहे ती परिस्थिती सांभाळून ठेवा विशेषतः नवीन नोकरी बदलण्याच्या भानगडीत न पडता आहे ती नोकरी प्रामाणिकपणे व शिस्तबद्ध रीतीने चालू ठेवा. नोकरीतील परिस्थिती थोड्या काळानंतर बदलेल. नोकरी सोडणे अतिशय धाडसाचे ठरेल नाही त्या मोहात पडू नका. व्यवसाय धंद्यात समाधानकारक परिस्थिती राहून उलाढाल वाढलेली दिसेल नफ्याचे प्रमाण वाढून उत्पन्नात वृद्धि होईल. व्यवसाय विस्तारासाठी विचार करू शकाल. स्वतःच्या घरा विषयी चे प्रयत्न चालू ठेवा यश मिळेल.अध्यात्म व धार्मिकता या विषयात रस निर्माण होईल. |
![]() |
कामे पूर्ण होतीलधनु : सदरच्या कालावधीमध्ये आपल्या आजूबाजूस अशा काही घटना घडतील की आपले रोजचे जीवनमान बदलून जाईल अर्थातच या घटना सकारात्मकच असतील. दीर्घकालीन रखडलेली कामे आपण जी पूर्ण करण्याचा प्रयत्न मनापासून करून सुद्धा ती होत नव्हती अशा प्रकारची कामे पूर्ण होतील त्यामुळे दिलासा मिळेल. परमेश्वराचे आभार माना. दीर्घकालीन रखडलेले जमिनी विषयीचे व्यवहार गतिशील होतील त्यातून आर्थिक फायदा मिळू शकतो जुन्या गुंतवणुकीतून भरघोस आर्थिक फायदा मिळेल नव्या तालुका करताना सावध राहणे गरजेचे आहे. कौटुंबिक आघाडीवर खुश असाल. |
![]() |
नवीन संधींचा लाभ मिळू शकेलमकर : शुभ ग्रह मानामुळे आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रातून नवीन नवीन संधींचा लाभ मिळू शकेल परंतु त्या संधीचे सोने करणे आपल्याच हातात आहे हे नीट लक्षात ठेवणे जरुरी आहे. व्यवसाय-धंद्यात काही नवीन करारमदार होण्याची शक्यता आहे नवीन भागीदारी साठी विचारणा होऊ शकते व्यवसाय विस्ताराच्या कल्पना आपल्या फलद्रूप होऊ शकतात त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे जरुरी आहे तसेच सरकारी योजनांचा फायदाही मिळू शकेल. फक्त आपल्या प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. विवाह योग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील प्रेमात यश लाभेल. |
![]() |
रोजगाराचा प्रश्न सुटेलकुंभ : नोकरी व्यवसाय धंद्यात अनुकूल घटना घडल्यामुळे आपल्या आनंदात भर पडेल आपण ज्या गोष्टींची वाट बघत होता त्या आता फलद्रूप होत असताना बघून उत्साह वाटेल आपल्या पुढील कामे आपण वेगाने कराल. आपण घेतलेले निर्णय बरोबर होते हे पाहून आपल्या उत्साहात भर पडेल. व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून हा विचार करू शकाल तसेच नोकरी मध्ये अनुकूल वातावरण लाभेल. ज्यांना नोकरी नाही अशांना नोकरी मिळेल. रोजगाराचा प्रश्न सुटेल. आत्मविश्वासाने आपण इतरांशी बोलून आपली कामे करून घ्याल प्रवासाचे योग आहेत. कुटुंब परिवारातील वातावरण चांगले राहील. |
![]() |
अनावश्यक खर्चाला कात्री लावामीन : आर्थिक स्थिती चांगली राहून मानसिकता सकारात्मक राहील व्यवसायिक जुनी येणी वसूल करताना थोडाफार त्रास होण्याची शक्यता आहे पण वाद विवाद आणि भांडणे टाळा तसेच अनावश्यक खर्चाला कात्री लावा काहींना दूरचे प्रवास करावे लागतील सहकुटुंब सहपरिवार देवदर्शनासाठी प्रवास घडू शकतो त्यात जरी बराच खर्च झाला तरी मन प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण केल्या मुळे समाधानी रहाल.कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील विवाहातील अडचणी दूर होतील घरी पाहुण्यांचे आगमन होईल व्यवसाय धंद्यामध्ये भरभराट होईल. |











