Home महाराष्ट्र नाशिक Nashik : पंचवटी एक्सप्रेसखाली येऊन मामा-भाचा गंभीर जखमी, मामाच्या हाताची चार बोटे तुटली तर भाच्यानं पाय गमावला

Nashik : पंचवटी एक्सप्रेसखाली येऊन मामा-भाचा गंभीर जखमी, मामाच्या हाताची चार बोटे तुटली तर भाच्यानं पाय गमावला

0
Nashik : पंचवटी एक्सप्रेसखाली येऊन मामा-भाचा गंभीर जखमी, मामाच्या हाताची चार बोटे तुटली तर भाच्यानं पाय गमावला

नाशिक : रेल्वे प्रवासादरम्यान झालेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. इगतपुरी रेल्वे स्थानक परिसरात पंचवटी एक्सप्रेसखाली आल्याने मामा आणि त्यांचा अवघा १२ वर्षांचा भाचा गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत चिमुकल्या भाच्याला आपला एक पाय गमवावा लागला, तर मामाच्या हाताची चार बोटे तुटली आहेत.

नेमका हा अपघात कसा घडला ?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मामा आणि त्यांचा १२ वर्षीय भाचा पंचवटी एक्सप्रेसने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान गाडी इगतपुरी रेल्वे स्थानकावर थांबली. यावेळी भाचा लघुशंकेसाठी खाली उतरला. मात्र, तो खाली उतरलेला असतानाच अचानक रेल्वे सुरू झाली. याच गडबडीत दोघांचाही तोल गेला आणि ते थेट रेल्वेच्या चाकाखाली आले. या अपघातात रेल्वेच्या चाकाखाली आल्याने दोघांनाही गंभीर दुखापत झाली. १२ वर्षीय भाच्याचा एक पाय निकामी झाला असून, त्याला तो गमवावा लागला आहे. तर मामाच्या हाताची चार बोटे तुटली आहेत. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

https://www.prahaar.in/2026/11/24/nashik-fda-takes-swift-action-in-nashik-licenses-of-three-establishments-suspended/

 इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु 

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही तात्काळ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता पुढील उपचारांसाठी नाशिकला हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांनी विशेष काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा या घटनेतून अधोरेखित झाली आहे. गाडी थांबल्यानंतरही सुरक्षिततेची खात्री केल्याशिवाय खाली उतरू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या दुर्दैवी अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here