आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत वैभव सूर्यवंशीच्या वादळापुढे युएईने गुडघे टेकले. वैभव सूर्यवंशी जोरदार प्रहार करत युएईला डोकंच वर काढू दिलं नाही. युएईने विजयासाठी 250 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यात वैभव सूर्यवंशीने एकट्याने 204 धावा केल्या. यासह भारताने हा सामना वघ्या 14.2 षटकात जिंकला. (Photo: BCCI Twitter)वैभव सूर्यवंशीने अवघ्या 52 चेंडूत द्विशतक ठोकलं. तसेच 53 चेंडूत 204 धावा करून बाद झाला. यासह त्याने टी20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला. लिस्ट ए क्रिकेटमध्ये भारताकडून 14 फलंदाजांनी मिळून एकूण 18 द्विशतके झळकावली आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय वनडेत रोहित शर्मा (3), शुभमन गिल (2), सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि इशान किशन यांनी द्विशतक ठोकले आहे. याशिवाय देशांतर्गत आणि ‘ए’ संघांच्या 50 षटकांच्या सामन्यांमध्ये पृथ्वी शॉ (2 वेळा), नारायण जगदीशन (277 धावा – विश्वविक्रम), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, स्वस्तिक सामल, यशस्वी जयस्वाल, कर्ण वीर कौशल आणि समर्थ व्यास यांनीही द्विशतकी खेळी केली आहे. (Photo: BCCI Twitter)व्यावसायिक क्रिकेटच्या एकाच डावात सर्वाधिक 28 षटकार मारण्याचा विश्वविक्रम भारताच्या वैभव सूर्यवंशीने केला आहे. या यादीत तन्मय अग्रवाल (26 षटकार, 2024) दुसऱ्या, तर कॉलिन मुनरो (23 षटकार, 2015) आणि डार्सी शॉर्ट (23 षटकार, 2018) संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. (Photo: BCCI Twitter)लिस्ट-ए वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक ठोकण्याचा विश्वविक्रम भारताच्या वैभव सूर्यवंशीने (52 चेंडू, भारत ‘ए’ विरुद्ध यूएई, 2026) केला आहे. या यादीत न्यूझीलंडचा चॅड बोवेस (103 चेंडू, 2024) दुसऱ्या, तर भारताचा एन. जगदीशन (114 चेंडू, 2022) आणि इंग्लंडचा हॅरी ब्रूक (114 चेंडू, 2026) संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. (Photo: BCCI Twitter)लिस्ट-ए वनडे शतकी खेळीत सर्वाधिक स्ट्राईक रेटचा विश्वविक्रम भारताच्या वैभव सूर्यवंशीने (384.90 स्ट्राईक रेट – 53 चेंडूंत 204 धावा, भारत ‘ए’ विरुद्ध यूएई, 2026) केला आहे. या यादीत एबी डिव्हिलियर्स (338.63 स्ट्राईक रेट – 44 चेंडूंत 149 धावा, 2015) दुसऱ्या, तर जेक फ्रेझर-मॅकगर्क (328.94 स्ट्राईक रेट -38 चेंडूंत 125 धावा, 2023) तिसऱ्या स्थानावर आहे. (Photo: BCCI Twitter)