कोलकाता: पश्चिम बंगालमधील भाजपाच्या महिला आमदार रेखा पात्रा यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. सध्या महिला आमदार रेखा पात्रा यांच्यावर कोलकात्यातील मुकुंदपूर येथील आर. एन. टागोर खासगी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार त्यांच्या शरीरात विषबाधा झाल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. नेमकी त्यांची कोणत्या कारणामुळे प्रकृती खालावली याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.
https://www.prahaar.in/2026/11/22/threat-of-2-bomb-blasts-in-hyderabad-warning-issued-to-kill-300-people-police-on-high-alert/
रेखा पात्रा ह्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हिंगलगंज विधानसभा मतदारसंघाच्या त्या भाजपाच्या महिला आमदार आहेत. रेखा पात्रा यांची शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यावेळी आमदार रेखा पात्रा त्यांच्या राहत्या घरी होत्या. सुरुवातीला त्यांना तातडीने बशीरहाट सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाल्यामुळे त्यांना कोलकात्यातली रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारांसाठी त्यांना कोलकात्यातील आर. एन. टागोर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक स्तरावर त्यांना ऑर्गनोफॉस्फरस आधारित कीटकनाशकाची विषबाधा झाली असावी, अशी चर्चा असली तरी रुग्णालय प्रशासनाकडून किंवा भाजपकडून याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
https://www.prahaar.in/2026/11/22/a-bag-containing-gold-jewellery-worth-%e2%82%b955-lakh-went-missing-delhi-police-tracked-it-down-within-six-days-and-returned-it-to-the-owner/
आमदार रेखा पात्रा यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच पश्चिम बंगालमधील राजकीय नेत्यांकडून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पश्चिम बंगालचे आरोग्यमंत्री शरद्वत मुखोपाध्याय यांनी रुग्णालयात जाऊन आमदार रेखा पात्रा यांची भेट घेतली आणि डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची सविस्तर विचारपूस केली. या घटनेमुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वैद्यकीय अहवाल आणि तपासणीनंतरच त्यांच्या प्रकृती बिघडण्यामागचे खरे कारण समोर येऊ शकेल, असे सांगितले जात आहे. सध्या त्या व्हेंटिलेटरवर असल्याने पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. डॉक्टर करत असलेल्या उपचारांवर रेखा पात्रा यांच्याकडून प्रतिसाद मिळावा आणि त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, अशी प्रार्थना कार्यकर्ते व नागरिकांकडून केली जात आहे.
https://www.prahaar.in/2026/11/22/marriage-between-cousins-will-the-practice-of-marrying-ones-maternal-uncles-daughter-come-to-an-end-discussion-sparked-by-a-petition-in-the-supreme-court/
आमदार रेखा पात्रा कोण आहेत?
रेखा पात्रा यांनी पश्चिम बंगालमधील तत्कालीन तृणमूल काँग्रेस सरकारवर महिलाविरुद्ध हिंसा आणि अत्याचाराचे आरोप करत जोरदार आंदोलन केले होते. आंदोलनातील त्यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रीय स्तरावर त्यांची दखल घेण्यात आली होती. त्यातूनच, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना संधी दिली आणि त्या आमदार बनल्या. दरम्यान, अवघ्या काही महिन्यांपूर्वीच राजकीय प्रवासात मोठी झेप घेतलेल्या या आमदाराची अशी अवस्था झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.