Home ताज्या घडामोडी Rakesh Bedi: ‘एक दुजे के लिए’च्या यशाची आठवण; राकेश बेदी म्हणाले, ‘धुरंधर’पेक्षा मोठा हिट होता

Rakesh Bedi: ‘एक दुजे के लिए’च्या यशाची आठवण; राकेश बेदी म्हणाले, ‘धुरंधर’पेक्षा मोठा हिट होता

0
Rakesh Bedi: ‘एक दुजे के लिए’च्या यशाची आठवण; राकेश बेदी म्हणाले, ‘धुरंधर’पेक्षा मोठा हिट होता
Photo: AI Generated

Rakesh Bedi: बॉलिवूड अभिनेता राकेश बेदी यांचा ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर द रिव्हेंज’मधील जमील जमाली ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. त्यांच्या या भूमिकेमुळे राकेश बेदी यांना प्रसिद्धीची नवी लाट अनुभवता आली. अलीकडेच, या अभिनेत्याने ‘एक दुजे के लिए’ चित्रपटाच्या यशाची आठवण करून दिली आणि 1981 चा हा चित्रपट ‘धुरंधर’पेक्षा मोठा हिट का होता, हे देखील सांगितले.

‘एक दुजे के लिए’ हा चित्रपट धुरंधरपेक्षाही हिट होता

57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) येथे 21 नोव्हेंबर रोजी, ‘धुरंधर’ प्रदर्शित झाला. राकेश यांनी या प्रदर्शनाला हजेरी लावली आणि ‘इंडियन पॅनोरमा’ विभागाचे उद्घाटन केले. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर,राकेश बेदी यांनी पत्रकार परिषद घेतली, जिथे त्यांनी चित्रपटाच्या यशाबद्दल सांगितले. त्यांनी 2025 च्या चित्रपटापूर्वी ‘एक दुजे के लिए’ सह अनेक सुपरहिट चित्रपट केले आहे. त्यावेळी देखील त्यांनी असे यश अनुभवल्याची आठवण सांगितली. सोशल मीडियाच्या अनुपस्थितीतही, हा चित्रपट भारतातील विविध शहरांमध्ये चार ते पाच वर्षे सुरू राहिला आणि प्रेक्षक त्यातील पात्रांमध्ये पूर्णपणे गुंतले होते.

https://www.prahaar.in/2026/11/23/puc-validity-check-has-your-vehicles-puc-expired-check-it-from-home-with-a-single-click-on-your-mobile/

राकेश बेदी काय म्हणाले?

“मी ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटाचा एक भाग होतो, ज्याला मिळालेल्या यशाची आजची पिढी कल्पनाही करू शकत नाही. तो ‘धुरंधर’पेक्षाही मोठा हिट होता. मात्र, सोशल मीडियामुळे ‘धुरंधर’देखील मोठा ठरला. आज एका बटणाने तुम्ही 1 सेकंदात जगभर फिरू शकता. पण त्या वेळी सोशल मीडिया नव्हता. त्या चित्रपटात मी एक विनोदी खलनायक होतो; माझ्यामुळे नायक आणि नायिका मरतात. त्यामुळे मला पत्रांच्या स्वरूपात जीवे मारण्याच्या धमक्या येत असत. तेव्हा फोन तर नव्हते. तर पत्रं यायची की, ‘तुम्हाला मारून टाकू. तुमच्यामुळे हे लोक मेले’!”

पुढे बोलताना, “तसेच मी अशा प्रतिक्रियाही पाहिल्या आहेत. तेव्हा, माझा टीव्ही शो ‘ये जो है जिंदगी’ सुद्धा खूप यशस्वी झाला होता. पण ते यश मर्यादित होते कारण तेव्हा सोशल मीडिया नव्हता. तर दुसरीकडे, ‘धुरंधर’चे यश खूप वेगळे आहे. गेल्या 10-15 वर्षांत मी इतक्या मोठ्या यशाची चव कधीच चाखली नाही. माझे चित्रपट हिट झाले आहेत, पण इतका मोठा हिट कधीच नव्हता. मला नाही वाटत की ‘धुरंधर’सारखा हिट कोणाला मिळाला असेल. तो पूर्णपणे अतुलनीय आहे. अनेक चित्रपट समीक्षक आता भारतीय चित्रपटसृष्टीला तीन प्रमुख टप्प्यांमध्ये विभागतात, ‘मुघल-ए-आझम’ (1960), ‘शोले’ (1975) आणि ‘धुरंधर’.”

एक दुजे के लिये चित्रपट

‘एक दुजे के लिए’ हा चित्रपट के. बालचंद्रन यांचा एक रोमँटिक ट्रॅजेडी चित्रपट आहे. हा चित्रपट 1981 साली प्रदर्शित झालं असून ज्याद्वारे कमल हासन यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि रती अग्निहोत्री यांना हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख मिळाली ती अजरामर ठरली. या रोमँटिक ड्रामामध्ये राकेश हे चक्रवर्ती, जे ‘चक्रम’ या नावाने लोकप्रिय आहेत, यांची भूमिका साकारली. त्यांनी एक विनोदी पण खलनायकी पात्र साकारले होते, ज्याला सपनाच्या (रती अग्निहोत्री) आईने तिला पटवण्यासाठी आणि वासूला (कमल हासन) विसरण्यास मदत करण्यासाठी आणले होते. परंतु, चक्रम स्वतःच सपनाच्या प्रेमात पडतो आणि त्या दोन प्रेमींमध्ये गैरसमजाचे कारण बनतो. अखेरीस, तो सपना त्याच्याशी लग्न करत आहे असा वासूचा विश्वास बसवून त्याला फसवतो. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला आणि त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक बनला.

धुरंधर

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा 2025 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. पहिल्या भागात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि सारा अर्जुन यांच्यासह इतर कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि त्याने बॉक्स ऑफिसचे अनेक विक्रम मोडीत काढले. आखाती देशांमध्ये बंदी असूनही, या चित्रपटाने जगभरात ₹ 1300 कोटींहून अधिक कमाई केली. तर चित्रपटाचा दुसरा भाग, ‘धुरंधर: द रिव्हेंज’, याने जगभरात ₹ 1800 कोटींहून अधिक कमाई केली आणि देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ₹1000 कोटींचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय चित्रपट म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here