Home ताज्या घडामोडी Navi Mumbai Fire: नवी मुंबईमध्ये ऑईल कंपनीला भीषण आग, आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट

Navi Mumbai Fire: नवी मुंबईमध्ये ऑईल कंपनीला भीषण आग, आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट

0
Navi Mumbai Fire: नवी मुंबईमध्ये ऑईल कंपनीला भीषण आग, आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट
नवी मुंबईमध्ये ऑईल कंपनीला भीषण आग, आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट फोटो सौजन्य: ANI News

नवी मुंबई: नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर 18 मधील एका तेल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना रविवारी रात्री घडली. मॅफ्को मार्केटच्या मागच्या बाजूला असणाऱ्या सप्तश्रृंगी ऑईल कंपनीच्या गोदामाला ही भीषण आग लागली. ऑईल कंपनीला लागलेल्या आगीमुळे, शेजारी असणाऱ्या एका प्लायवुड कंपनीला आणि कुरियर कंपनीला सुद्धा आग लागल्याची घटना घडली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही आग लागल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये बराच वेळ भीतीचे वातावरण होते. सप्तश्रृंगी ऑईल कंपनीमध्ये लागलेल्या आगीने शेजारी असणाऱ्या इतरत्र दोन कंपन्यांनाही आपल्या कवेत घेतले होते. मध्यरात्री 2 वाजेपर्यंत आगीच्या ज्वाळांचा भडका परिसरामध्ये पाहायला मिळत होता.

https://www.prahaar.in/2026/11/22/a-180-meter-long-musical-fountain-at-powai-lake-will-showcase-the-history-and-culture-of-maharashtra/

दरम्यान, ऑईल कंपनीला लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले होते. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर आगीच्या उंचच उंच ज्वाळा आणि काळ्या धुरांचे लोट दूरवरुन पाहायला मिळत होते. ज्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये घबराट होती. या भीषण आगीच्या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणावर मात्र वित्तहानी झालेली आहे. सुदैवाने, घटना घडली त्यादिवशी रविवारचा दिवस होता, त्यामुळे कंपनीमध्ये कामगार नव्हते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याची दिलासादायक बाब आहे. आगीची घटना नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर 18 मधील प्लॉट क्रमांक 38 मध्ये, मॅफ्को मार्केटच्या मागे सप्तश्रृंगी ऑईल कंपनी आहे. आग लागलेल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कंपन्या आणि वेगवेगळे गोदाम आहेत. त्यामुळे तिथे आग भडकण्याची मोठी शक्यता होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

इंडस्ट्रीयल कंपन्यांनी वेढलेल्या ह्या परिसरामध्ये आगीचा भडका झाला असता तर, शेजारील कंपन्यांनाही मोठ्या प्रमाणावर धोका उद्भवला असता. तेल कंपनीला आग लागल्यामुळे आग भडकण्याची मोठी शक्यता होती. पण शेजारी असणाऱ्या एका प्लायवुड कंपनीला आणि कुरियर कंपनीला सुद्धा आग लागली होती. आगीदरम्यान होणाऱ्या स्फोटसदृश आवाजांमुळे स्थानिक नागरिक आणि आसपासच्या परिसरातील लोकांमध्ये मोठी घबराट उडाली आहे. दरम्यान, आग नेमकी कशी लागली याची कोणतीही माहिती अद्यापही मिळालेली नाही. अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस यांच्याकडून संयुक्तपणे घटनेचा तपास केला जाणार आहे. आगीत तीन कंपन्यांमधील कोट्यवधी रुपयांच्या मालाची मोठी हानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

https://www.prahaar.in/2026/11/22/mumbai-police-to-get-smart-id-cards-with-qr-codes/

आगीची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तात्काळ धाव घेत संपूर्ण घटना ताब्यात घेतली. अद्यापही आग विजवण्याचे प्रयत्न सुरू आहे. सध्या आग नियंत्रणात आहे. ऐरोली, रबाळे, कोपरखैरणे, वाशी, नेरुळ आणि सीबीडी बेलापूर येथील अग्निशमन केंद्रांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाचे जवान गोदामाच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. सोमवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, तेलाचा मोठा साठा आणि ज्वलनशील पदार्थांमुळे आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागली, हे मात्र नक्की. प्रत्यक्षदर्शी आणि प्राथमिक माहितीनुसार आगीची घटना रात्री 9 घडली होती. मात्र आगीचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे अग्निशमन दलाला आग विझवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर करावे लागले. खबरदारीच्या उपायाकरिता स्थानिक पोलीस आणि इतर बचाव यंत्रणांना घटनास्थळी तैनात करत संपूर्ण घटना नियंत्रणात आणली गेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here