मुंबई: वेलिंग्टन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळला जात असलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित अर्थात ड्रॉ झाला आहे. हा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यामुळे, कसोटी सामन्यांच्या गुणतालिकेतील गुण सध्या बरोबरीत आहे. न्यूझीलंडचा पराभव टाळण्यामध्ये आणि वेलिंग्टन कसोटी ड्रॉ ठेवण्यात न्युझीलंडचा खेळाडू डॅरिल मिचेलने महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यामध्ये त्याला ग्लेन फिलिप्सने उत्तम साथ दिली. जो आपल्या नेहमीच्या खेळाच्या विरुद्ध खेळला. पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात, जेव्हा खेळाचे 15 ओव्हर शिल्लक होते, तेव्हा भारत आणि न्यूझीलंडने सामना अनिर्णित ठेवण्यास सहमती दर्शवली. दोन्ही संघांनी परस्पर संमतीने हस्तांदोलन करत, हा महत्त्वाचा निर्णय घेतला.
https://www.prahaar.in/2026/11/22/india-secures-a-resounding-victory-in-the-india-new-zealand-centenary-hockey-series-clinches-the-series-1-0-after-the-final-match-ends-in-a-draw/
पाचव्या दिवशी भारताला न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावातील उर्वरित आठ विकेट्स घेणं आवश्यक होते. मात्र, भारतीय गोलंदाजांना हे जमले नाही. अंतिम दिवशी त्यांना केवळ तीन विकेट्स घेता आल्या. दिवसाचा खेळ संपायला अंदाजे 15 ओव्हर शिल्लक असताना, दोन्ही संघांनी परस्पर संमतीने सामना संपवण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा बॅट्समन डॅरिल मिचेलने कसोटी सामना ड्रॉ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने एकट्याने 186 चेंडूंचा सामना केला आणि 49 धावांवर नाबाद झाला. न्यूझीलंडची पाचवी विकेट पडल्यानंतर क्रीजवर आलेल्या ग्लेन फिलिप्सनेही मिचेलला महत्त्वपूर्ण साथ दिली. फिलिप्स सहसा त्याच्या आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. तथापि, वेलिंग्टन कसोटीत त्याने गरजेनुसार फलंदाजी केली. त्याने 120 चेंडूंचा सामना केला आणि केवळ 26 धावांवर नाबाद राहिला.
https://www.prahaar.in/2026/11/22/syed-mushtaq-ali-trophy-5-wickets-in-just-9-balls-railways-bowler-jamshed-alam-becomes-the-third-indian-to-take-a-double-hat-trick/
मिचेल आणि फिलिप्सने 259 चेंडूंमध्ये सहाव्या विकेटसाठी नाबाद 63 धावांची भागीदारी करून सामना ड्रॉ केला. कसोटी सामन्यात, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत आपल्या पहिल्या डावात 368 धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारताने 9 गडी बाद 720 धावांवर आपला पहिला डाव घोषित करून 352 धावांची आघाडी घेतली. न्यूझीलंडला आपल्या दुसऱ्या डावात भारताची पहिल्या डावातील आघाडी पार करता आली नाही. न्युझीलंड संघाने आपल्या दुसऱ्या डावात 5 गडी बाद 239 धावा केल्या, ज्यामुळे सामना अनिर्णित राहिला. भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या 11 वर्षांत प्रथमच सलग दोन कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. वेलिंग्टन कसोटीपूर्वी, कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्धचा आधीचा सामनाही अनिर्णित राहिला होता. भारताने 503 धावा करून डाव घोषित केला. तथापि, 203 धावांची आघाडी घेऊन फॉलो- ऑन देऊनही, भारताला पुढच्या डावात एकही विकेट घेता आली नाही, परिणामी सामना अनिर्णित राहिला.