अहिल्यानगर (प्रतिनिधी): राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत एकवेळ समझोता (ओटीएस ) योजनेतील पात्र शेतकर्यांची पहिली यादी 20 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत राज्यातील एकूण 1 लाख 69 हजार 820 पात्र शेतकर्यांचा समावेश करण्यात आला असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल 26 हजार 703 शेतकर्यांचा समावेश आहे.
https://www.prahaar.in/2026/11/23/a-treat-for-runners-cross-country-competition-to-be-held-at-madhi-on-the-6th/
राज्य शासनाने 2 जून 2026 रोजी शासन निर्णयाद्वारे ही योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये कर्जमाफी, एकवेळ समझोता (ओटीएस ) आणि प्रोत्साहन असे तीन घटक आहेत. योजनेच्या ओटीएस घटकांतर्गत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या पात्र शेतकर्यांनी दोन लाख रुपयांवरील स्वतःचा हिस्सा संबंधित बँकेत भरल्यानंतर शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये शेतकर्यांचे नाव, बँकेचे नाव, कर्जखात्याचा तपशील, थकबाकीची रक्कम, शेतकर्याने भरावयाची रक्कम आणि शासनाकडून मिळणारा लाभ याची माहिती देण्यात आली आहे. ही यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/23/nashik-leopard-attacks-women-during-sugarcane-harvesting-two-women-critically-injured/
पात्र शेतकर्यांनी यादीतील आपला तपशील तपासून स्वतःच्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत जमा करावी. ही रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तसेच योजनेचा लाभ मिळण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. विशेष म्हणजे, ही केवळ पहिली यादी असून बँकांकडून प्राप्त होणार्या माहितीचे संगणकीय संस्करण करून पुढील काळातही पात्र शेतकर्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या योजनेमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या पात्र शेतकर्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.