Home ब्रेकिंग न्यूज Central Railway : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे 15 अनारक्षित विशेष गाड्या चालवणार

Central Railway : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे 15 अनारक्षित विशेष गाड्या चालवणार

0
Central Railway : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे 15 अनारक्षित विशेष गाड्या चालवणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने ४ ते ८ डिसेंबर २०२६ या कालावधीत १५ अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर – मुंबई मार्गावर ९ गाड्या

नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान एकूण ८ गाड्या धावणार आहेत. ४ डिसेंबरला सायंकाळी ६.१० आणि रात्री ११.५५ वाजता नागपूरहून दोन गाड्या सुटतील. ५ डिसेंबरला सकाळी ७.४० आणि सायंकाळी ६.१० वाजता आणखी दोन गाड्या असतील. परतीसाठी ६ डिसेंबरला रात्री ८.२५ वाजता, ७ डिसेंबरला सकाळी १०.३० आणि दुपारी १२.३५ वाजता, तर ८ डिसेंबरला मध्यरात्री १२.२५ वाजता मुंबईहून नागपूरला गाड्या सुटतील. या गाड्यांना अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर येथे थांबा असेल. याशिवाय ७ डिसेंबरला दादरहून मध्यरात्री १२.४० वाजता नागपूरला एक स्वतंत्र विशेष गाडीही सोडण्यात येणार आहे.

https://www.prahaar.in/2026/11/23/mumbai-book-festival-2026-to-be-inaugurated-by-chief-minister-devendra-fadnavis-tomorrow-entry-is-free/

कलबुरगि, अमरावती, कोल्हापूरहूनही गाड्या

कलबुरगि – मुंबई दरम्यान २ गाड्या चालवल्या जातील. ५ डिसेंबरला सायंकाळी ६.३० वाजता कलबुरगिहून गाडी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.२० वाजता मुंबईत पोहोचेल. परतीची गाडी ७ डिसेंबरला मध्यरात्री १२.२५ वाजता मुंबईहून सुटेल. अमरावती – मुंबई दरम्यानही २ गाड्या असतील. ५ डिसेंबरला सायंकाळी ५.४५ वाजता अमरावतीहून गाडी सुटेल. परतीची गाडी ७ डिसेंबरला मध्यरात्री १२.४० वाजता मुंबईहून सुटणार आहे. कोल्हापूर – मुंबई दरम्यानही २ गाड्या असतील. ५ डिसेंबरला सायंकाळी ४.४० वाजता कोल्हापूरहून गाडी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता मुंबईत पोहोचेल. परतीची गाडी ६ डिसेंबरला रात्री १०.३० वाजता मुंबईहून सुटेल.

तिकीट आणि सुविधा

या सर्व गाड्या अनारक्षित असून १६ ते २२ डब्यांच्या असतील. तिकिटे सामान्य दराने UTS प्रणालीद्वारे बुक करता येतील. सविस्तर वेळापत्रक आणि थांब्यांची माहिती enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर किंवा NTES अॅपवर उपलब्ध आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने योग्य उपाययोजना केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here