Home ताज्या घडामोडी अहिल्यानगर शहरात भाजपकडून ‘लोकतंत्र बचाव भीडतंत्र हटाव’ महारॅलीचे आयोजन, पदयात्रेमध्ये हजारो नागरिक यात्रेत सहभागी

अहिल्यानगर शहरात भाजपकडून ‘लोकतंत्र बचाव भीडतंत्र हटाव’ महारॅलीचे आयोजन, पदयात्रेमध्ये हजारो नागरिक यात्रेत सहभागी

0
अहिल्यानगर शहरात भाजपकडून ‘लोकतंत्र बचाव भीडतंत्र हटाव’ महारॅलीचे आयोजन, पदयात्रेमध्ये हजारो नागरिक यात्रेत सहभागी
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

अहिल्यानगर: लोकतंत्र बचाव भीडतंत्र हटाव महारॅली हे कोणतेही शक्तीप्रदर्शन नाही. लोकशाही व्यवस्थेचे संरक्षण करण्याचा हा निर्धार आहे. हा देश संसदेतून चालेल परदेशातून नाही. तुमच्या धाक दडपशाहीला देशातील जनता थारा देणार नाही असा इशारा जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने अहिल्यानगर शहरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या रॅलीचा समारोप दिल्लीगेट येथे जाहीर सभेने करण्यात आला. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, आ.मोनिका राजळे, आ.अक्षय कर्डीले, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, उपमहापौर धनंजय जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहराचे अध्यक्ष अनिल मोहिते, उत्तर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकरी, कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

https://www.prahaar.in/2026/11/23/horrific-bus-accident-on-samruddhi-expressway-2-passengers-dead-30-injured/

यावेळी आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील यांनी काॅग्रेस नेते राहूल गांधी यांच्यावर सडकून टिका केली. वर्षानुवर्ष देशात कॉग्रेसची राजवट होती. पण त्यांना संविधान दिन साजरा करावासा वाटला नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी देशात संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय करून भारताच्या संविधाना प्रति असलेला आदर दाखवून दिल्याकडे लक्ष वेधून अहिल्यानगर जिल्हा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाते खूप वेगळे होते. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतून कॉग्रेसला इशारा देताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, हा देश संविधानाच्या आधाराने पुढे जाईल. तुमच्या धाक दडपशाहीने नाही. मागील काही दिवसात या देशामध्ये कॉग्रेस आणि त्यांच्या काही मित्र पक्षांनी संविधानाच्या नावाखाली केवळ अराजक माजवून देशातील वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. कॉग्रेसच्या भूमीकेला आता कोणताही आधार राहीलेला नाही. ज्यांच्याकडे कोणताही विचार आता शिल्लक नाही. सातत्याने निवडणुकांमध्ये होत असलेल्या पराभवाने काँग्रेस नेते हतबल झाले आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/23/groundwater-levels-plummet-drought-crisis-intensifies-with-a-maximum-drop-of-4-87-meters-recorded-in-gar-taluka/

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील बारा वर्षात देशाने सर्वच क्षेत्रामध्ये केलेल्या प्रगतीमुळे भारत देश महासतेच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. पण काही परदेशी शक्तींना हे पाहावत नाही. म्हणूनच परदेशी शक्तीच्या जोरावर देशाला बदनाम करण्याचे काम काँग्रेसकडून सातत्याने सुरू असल्याचा आरोप मंत्री विखे पाटील यांनी केला. पुढे बोलताना विखे म्हणाले, संविधान हातात घेवून राहूल गांधी फिरत आहेत. पण देशातील जनता एवढी दूधखुळी नाही. संविधानाची आजपर्यत कॉग्रेस पक्षाने कशी पायमल्ली केली हे देशाने चांगले ओळखले आहे. लोकसभेची मागील सर्व अधिवेशन आपण पाहीली. महत्वाच्या विषयावरील एकाही चर्चेत कॉग्रेस पक्ष सहभागी झाला नाही. संविधानाच्या आधारे चर्चा करण्याची मानसिकता कॉग्रेस नेत्यांची नाही. याचा अर्थ कॉग्रेसचा विश्वास संविधान आणि संसदेवर नाही. या रॅलीतून आम्ही त्यांना इशारा देतो, जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आहे तोपर्यत लोकशाहीची लढाई संसदेतच होईल. मात्र रस्त्यावर लढण्याची वेळ आली तरी, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता यासाठी मागे हटणार नाही असा इशारा मंत्री विखे पाटील यांनी दिला.

https://www.prahaar.in/2026/11/23/nashik-leopard-attacks-women-during-sugarcane-harvesting-two-women-critically-injured/

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसीत भारत घडवायचा आहे. जिथे गरिबाला न्याय मिळेल, शेतकऱ्याला सन्मान मिळेल,युवकांना रोजगार मिळेल आणि प्रत्येक नागरिकाला विकासाच्या संधी मिळतील. राजकारणापेक्षा राष्ट्रहित महत्वाचे आहे. संविधानाचा सन्मान करून लोकशाही संस्थांवरील विश्वास अधिक मजबुत करण्यासाठी आपल्या सर्वाना कटीबद्ध व्हावे लागणार असल्याचे मंत्री विखे यांनी शेवटी सांगितले. सभापती प्रा.राम शिंदे यांनी आपल्या भाषणात अतिशय त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य लोकशाही मध्ये परावर्तित झाले आहे. निवडणुकांमध्ये पराभव होतो. लोकांना विचार पटत नाही तेव्हा विरोधी पक्ष म्हणून सुध्दा भूमिका करता आला पाहीजे. दुर्दैवाने देशात केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संविधानिक संस्थांची बदनामी करण्याचे काम सुरू आहे. जनतेचा कधीच विचार न केलेल्यांना चोख उतर देण्यसाठी ही रॅली असल्याचे सभापती शिंदे यांनी सांगितले. याप्रसंगी आ.मोनिका राजळे, आ.अक्षय कर्डीले, डॉ सुजय विखे पाटील यांची मनोगते पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here