Home ताज्या घडामोडी पाण्याच्या गुणवत्तेवरील आरोपांवर ‘बिसलेरी’ कंपनीकडून स्पष्टीकरण, म्हणाले…

पाण्याच्या गुणवत्तेवरील आरोपांवर ‘बिसलेरी’ कंपनीकडून स्पष्टीकरण, म्हणाले…

0
पाण्याच्या गुणवत्तेवरील आरोपांवर ‘बिसलेरी’ कंपनीकडून स्पष्टीकरण, म्हणाले…
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई: FSSAI ने बाटली बंद पिण्याच्या पाण्याची असलेल्या ‘बिसलेरी’ कंपनीच्या विरोधात खटला चालवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. FSSAI ने ‘बिसलेरी’ कंपनीच्या बाटली बंद असलेले पिण्याचे पाणी असुरक्षित असल्याचे घोषित केले होते. त्यानंतर आता ‘बिसलेरी’ कंपनीने आता एक निवेदन जारी करून आपले पाणी पिण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे म्हटले आहे, आणि FSSAI मधील हे प्रकरण सुमारे 14 महिने जुने असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

https://www.prahaar.in/2026/11/23/puc-validity-check-has-your-vehicles-puc-expired-check-it-from-home-with-a-single-click-on-your-mobile/

‘बिसलेरी’ कंपनीने दिलेल्या निवेदनामध्ये नमुद केले की, सप्टेंबर 2025 मधील असून कंपनीच्या गोव्यातील प्लांटमध्ये उत्पादित केलेल्या एका बॅचसंबंधित संपूर्ण प्रकरण आहे. ‘बिसलेरी’चे देशामध्ये एकूण 143 प्लांट आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर 2025 रोजी FSSAIने गोवा युनिटमधून सहा नमुने गोळा केले होते. प्राथमिक चाचण्यांमध्ये असे दिसून आले की, पाच नमुने व्यवस्थित होते, ते सर्व मानकांची पूर्तता करत होते. सहाव्या नमुन्यात ब्रोमेटची पातळी प्रति लिटर 12 मायक्रोग्रॅम होती, जी प्रति लिटर 10 मायक्रोग्रॅमच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे.

 

22 नोव्हेंबर, 2025 रोजी कंपनीने केलेल्या अपीलनंतर, नमुना पुनर्तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. बिस्लेरीच्या म्हणण्यानुसार, तपासणीवेळी नमुन्यामध्ये प्रयोगशाळेला ब्रोमेटची पातळी विहित मर्यादेत आढळली, परंतु त्यांनी स्वतंत्रपणे पॉलिन्यूक्लियर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) ची नोंद केली. या विसंगतीमुळे, बिस्लेरीने FSSSAI मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत एक स्वतंत्र चाचणी करुन घेतली, ज्यात देखील ब्रोमेटची पातळी एक सारख्या मर्यादेत आढळली. 2 फेब्रुवारी 2026 रोजी बिसलेरीला मिळालेल्या पत्राद्वारे FSSAI च्या पश्चिम प्रादेशिक कार्यालयाला स्वतंत्र तपास अहवाल सादर केला होता. त्यानंतर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, कंपनीला हे प्रकरण बंद झाल्याचे वाटले. बिस्लेरीच्या म्हणण्यानुसार, FSSAI ने अद्याप ईमेलद्वारे किंवा छापील स्वरूपात कोणतीही सूचना मिळालेली नाही आणि FSSAI च्या वेबसाइटवरही अशी कोणतीही सूचना दिसत नाही.

https://www.prahaar.in/2026/11/23/up-cm-yogi-adityanath-tribute-mother-savitri-devi-sanatan-sanskar/

कंपनीने पुढे दिलेल्या माहितीनुसार, “पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता ही ‘बिसलेरी’ कंपनीसाठी ही एक प्राथमिकता आहे. आम्ही आमच्या 10 टप्प्यांच्या उत्पादन प्रक्रियेदरम्यान 90 हून अधिक चाचण्यांद्वारे कठोर गुणवत्ता नियंत्रण राखतो. योग्य नियामक प्रक्रियेद्वारे हे प्रकरण सोडवण्यासाठी FSSAI ला सहकार्य करत राहू. अनेक वर्षांपासून एक विश्वासार्ह ब्रँड असलेले ‘बिसलेरी’ पिण्यासाठी सुरक्षित आहे.” FSSAI ने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, बाटली बंद पिण्याच्या पाण्याचा (मिनरल वॉटर वगळता) नियामक नमुना विहित ब्रोमेट मर्यादेचे पालन करत नसल्याने एफएसएस कायदा, 2006 अंतर्गत तो असुरक्षित घोषित करण्यात आला होता.
FSSSAI च्या मते, कंपनीच्या अपीलवर, संदर्भित PAHs च्या उपस्थितीमुळे नमुना असुरक्षित असल्याचे घोषित केले. याच्या आधारावर, बिसलेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडविरुद्ध खटला चालवण्याची परवानगी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here