Home क्रीडा कसोटीत ऋषभ पंत नावाचं वादळ, दमदार शतक ठोकत गेमच फिरवला; ‘SENA’ देशात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

कसोटीत ऋषभ पंत नावाचं वादळ, दमदार शतक ठोकत गेमच फिरवला; ‘SENA’ देशात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

0
कसोटीत ऋषभ पंत नावाचं वादळ, दमदार शतक ठोकत गेमच फिरवला; ‘SENA’ देशात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू
फोटो सौजन्य: BCCI (X Account)

मुंबई: वेलिंग्टनमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यामध्ये चौथ्या दिवशी भारताच्या यष्टीरक्षक (विकेटकिपर) फलंदाज ऋषभ पंतने दमदार कामगिरी इतिहास रचला आहे. त्याच्या दमदार खेळीने आजचा चौथा दिवस कमालीचा गाजलेला आहे. चौथ्या दिवसाची सुरूवातच भारताच्या फलंदाजांनी आक्रमक पद्धतीने फलंदाजी केलेली पाहायला मिळाली. दरम्यान, भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यामध्ये चौथ्या दिवशी भारताचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने पहिल्याच डावात शानदार शतक झळकावले आहे.

https://www.prahaar.in/2026/11/21/indian-squad-announced-for-u19-womens-t20-series-against-england-bhavika-ahire-named-captain/

या डावखुऱ्या भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाने नऊ चौकार आणि चार षटकारांसह 135 चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केले. हे ऋषभ पंतच्या कसोटी कारकिर्दीतील नववे शतक असून न्यूझीलंडविरुद्धचे त्याचे हे पहिलेच शतक आहे. या शतकामुळे वेलिंग्टन कसोटीत भारताची स्थिती अधिक मजबूत झाली आहे. 133 चेंडूंमध्ये 95 धावा करून ऋषभ पंतने आपल्या खास शैलीत शतक पूर्ण केले. त्याने पुढच्या दोन चेंडूंवर एक चौकार आणि त्यानंतर एक षटकार मारून 135 चेंडूंमध्ये शतकाचा टप्पा गाठला. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्राच्या शेवटच्या चेंडूवर न्युझीलंडचा गोलंदाज रचिन रवींद्रच्या वेळी पंत बाद झाला. त्याने 153 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 6 षटकारांसह 128 धावा केल्या.

 

न्यूझीलंडमध्ये आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये केलेले हे ऋषभ पंतचे पहिले कसोटी शतक आहे. सर्व SENA देशांमध्ये कसोटी शतक झळकावणारा तो पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज आहे. पंतने 2018 मध्ये इंग्लंडमध्ये, 2019 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये, 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये आणि आता 2026 मध्ये न्यूझीलंडमध्ये कसोटी शतके झळकावली आहेत. सर्व SENA देशांमध्ये कसोटी शतक झळकावणारा ऋषभ पंत सहावा भारतीय फलंदाज ठरला आहे. या यादीत मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली आणि केएल राहुल या क्रिकेटरच्या नावांचा आधीच समावेश आहे. केएल राहुलनेही वेलिंग्टनमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यातच ही कामगिरी केली आहे.

https://www.prahaar.in/2026/11/21/ind-vs-nz-india-holds-a-strong-118-run-lead-at-the-end-of-the-third-day-gill-misses-out-on-a-century-by-just-2-runs/

ऋषभ पंतने त्याच्या नवव्या कसोटी मालिकेमध्ये शतक झळकावताना तीन खेळाडूंसोबत आपली विशेष खेळी केली. त्याने प्रथम शुभमन गिलसोबत चौथ्या विकेटसाठी 100 धावा जोडल्या. त्यानंतर त्याने अंशुल कंबोजसोबत पाचव्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली, तर ध्रुव जुरेलसोबत सहाव्या विकेटसाठी 75 धावा केल्या. पंतचे शतक आणि या तीन उत्कृष्ट भागीदारींमुळे भारताला पहिल्या डावात न्यूझीलंडवर मोठी आघाडी घेण्यास मदत झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here