मुंबई: वेलिंग्टन स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत विरुद्ध न्युझीलंड कसोटी सामन्याचा चौथ्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. कसोटी सामन्यादरम्यान न्यूझीलंड संघाचा सध्याच्या घडीला दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 119 धावांपर्यंत खेळ आहे. टीम इंडियाला हरवण्यासाठी न्युझीलंड संघाला आणखीन 233 धावांची आवश्यकता आहे. जेव्हा चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा डेव्हन कॉनवे 59 धावांवर आणि रचिन रवींद्र 27 धावांवर खेळत होते. तिसऱ्या दिवशी तत्पूर्वी, टीम इंडियाने आपली प्रभावी फलंदाजी सुरू ठेवत आपला पहिला डाव 9 गडी गमावून 720 धावांचं आवाहन टीम न्युझीलंडला दिलं आहे. टीम इंडियाने 352 धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी शतके झळकावली, तर यशस्वी जैस्वाल, कर्णधार शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल या सर्वांनी अर्धशतके केली.
https://www.prahaar.in/2026/11/22/rishabh-pant-century-ind-vs-nz-test-match-in-wellington-sixth-indian-batters-with-test-hundreds-in-all-sena-countries/
चौथ्या दिवसाच्या खेळाचे पहिले सत्र भारतीय संघाच्या नावावर होते, ज्यात त्यांनी 250 धावांची आघाडी केली. कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ऋषभ पंतने आपल्या दमदार खेळीने सर्वांचेच लक्ष वेधले. पंत आणि कंबोज यांनी सत्राच्या सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली, ज्यात पाचव्या विकेटसाठी दोघांमध्ये 68 धावांची भागीदारी झाली. नाईट वॉचमन म्हणून आलेला अंशुल कंबोज 38 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर ऋषभ पंतला ध्रुव जुरेलची साथ मिळाली आणि दोघांनी धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. आपले शतक पूर्ण करून ऋषभ पंत 128 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला. वेलिंग्टन कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचे दुसरे सत्रही भारतीय संघाच्या नावावर होते, ज्यात ध्रुव जुरेलने आपले अर्धशतक पूर्ण करण्यासोबतच 78 धावांची शानदार खेळी केली, तर टीम इंडियाने या सत्रात 9 गडी गमावून 720 धावा करत आपला पहिला डाव घोषित केला.
https://www.prahaar.in/2026/11/21/indian-squad-announced-for-u19-womens-t20-series-against-england-bhavika-ahire-named-captain/
टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावामध्ये, न्युझीलंडने दिलेल्या आवाहनापेक्षा 352 सर्वाधिक धावा करत त्यांना पुढचे आवाहन दिले. यानंतर, न्यूझीलंडची दुसऱ्या डावात खूपच खराब सुरुवात झाली, ज्यात त्यांनी शून्य धावसंख्येवर आपली पहिली विकेट गमावली. कर्णधार टॉम लॅथमला जसप्रीत बुमराहने दुसऱ्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात न्यूझीलंड संघाने आपल्या दुसऱ्या डावात खूपच चांगली फलंदाजी केली. पण 60 धावांवर त्यांचा दुसरा गडी बाद झाला. प्रमुख खेळाडू हेन्री निकोल्स 31 धावांवर प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर डेव्हन कॉनवेने रचिन रवींद्रसोबत तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाला कोणताही धक्का बसू दिला नाही.
दरम्यान, अजूनही न्युझीलँडचा संघ भारताने घेतलेल्या आघाडीपेक्षा 233 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे पाचवा दिवस हा महत्त्वाचा ठरणार आहे. टीम इंडिया आठ विकेट विजयापासून दूर आहे. तर न्युझीलंडला शेवटचा दिवस पूर्ण खेळून काढावा लागणार आहे त्यामुळे या सामन्याकडे क्रीडा प्रेमींच्या नजरा लागून आहेत.