Sachin Pilgaonkar Doctorate University: मराठी चित्रपटसृष्टीतील महागुरुंचा ग्वालेरमध्ये डॉक्टर ऑफ लिट्रेचर पदवीने गौरव करण्यात आला आहे. मराठी मनोरंजनविश्वासाठी ही आनंदाची बातमी असून अभिनेते आणि चित्रपट निर्माते सचिन पिळगावकर यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 21 नोव्हेंबर रोजी ग्वाल्हेर येथील ITM विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात त्यांना डॉक्टर ऑफ लिट्रेचर ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.
सचिन पिळगावकर यांनी मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीत ही आपल्या अभिनयाच्या जादूने सर्वांना वेड लावलं. केवळ अभिनय नाही तर, दिग्दर्शक आणि गायनातूनही सिनेइंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थाननिर्माण केलं. सहाहून अधिक दशके त्यांनी गाजवली आहेत. सचिन पिळगांवकर हे अष्टपैलू कलाकार आहेत. ते हे नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सचिन पिळगांवकर यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सिनेसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा विशेष पदवीने सन्मान करण्यात आला आहे. सचिन पिळगांवकर यांना ITM युनिव्हर्सिटी, ग्वाल्हेर यांच्याकडून गौरवण्यात आले आहे.
https://www.prahaar.in/2026/11/22/narendra-modi-nepals-prime-minister-balen-shah-to-visit-india-will-present-special-idol-gifts-to-modi-and-murmu/
आयटीएम युनिव्हर्सिटीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी सचिन पिळगांवकर यांना डॉक्टरेट ही पदवी देत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी दीक्षांत समारंभात सचिन पिळगांवकर यांचा सन्मान केला जाईल, अशी पोस्ट युनिव्हर्सिटीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आली होती. कलाक्षेत्रातील सचिन पिळगावकर यांच्या योगदानासाठी ही पदवी असल्यामुळे ती वैद्यकीय पदवी नसून मानद डॉक्टरेट आहे.
View this post on Instagram
सचिन पिळगांवकर यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सहा दशकातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना ITM युनिव्हर्सिटीने पुरस्काराने गौरवले. यावेळी त्यांची पत्नी आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर देखील उपस्थित होते. या सोहळ्यातील फोटोज आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर सध्या नेटकरी आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.