Home देश दिग्गज राजकारण्यांच्या उपस्थितीत Anirudh- Kavya Maran चा शाही रिसेप्शन सोहळा; पाहा Photos

दिग्गज राजकारण्यांच्या उपस्थितीत Anirudh- Kavya Maran चा शाही रिसेप्शन सोहळा; पाहा Photos

0
दिग्गज राजकारण्यांच्या उपस्थितीत Anirudh- Kavya Maran चा शाही रिसेप्शन सोहळा; पाहा Photos
दिग्गज राजकारण्यांच्या उपस्थितीत Anirudh- Kavya Maran चा शाही रिसेप्शन सोहळा; पाहा Photos
Anirudh- Kavya Maran Reception Event Photos
लोकप्रिय गायक- संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन आणि सनरायझर्स हैदराबादच्या सह मालकिण- सीईओ काव्या मारन यांचा अलीकडेच ग्रीसमध्ये ग्रँडपद्धतीने लग्नसोहळा पार पडला. आता लग्नानंतर या स्वीट कपलच्या शाही रिसेप्शन सोहळ्याची चांद्यापासून बांद्यापर्यंत तुफान चर्चा रंगली आहे. काल, 21 नोव्हेंबर शनिवारी चेन्नईमध्ये रिसेप्शन सोहळा पार पडला. या खास सोहळ्यासाठी फक्त टॉलिवूड सेलिब्रिटींनीच नाही तर, देशातील अनेक मातब्बर राजकारण्यांनीही ह्या रिसेप्शन सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
Anirudh- Kavya Maran Reception Event Photos
सर्वांच्याच लूकने अनिरूद्ध आणि काव्याच्या रिसेप्शन सोहळ्याला चार चाँद लावले होते. हा रिसेप्शन सोहळा चेन्नईतील आयटीसी ग्रँड चोला हॉटेलमध्ये रंगला. या खास सोहळ्यासाठी तामिळनाडूसह देशातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. सर्वांचेच फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी नवविवाहित जोडप्याला आयुष्यातील नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या.
Anirudh- Kavya Maran Reception Event Photos
देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी शनिवारी चेन्नईमध्ये झालेल्या संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन आणि सनरायझर्स हैदराबादची सहमालकिन काव्या मारन यांच्या शाही रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली होती.
Anirudh- Kavya Maran Reception Event Photos
केरळम राज्याचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी सुद्धा शनिवारी अनिरुद्ध आणि काव्याच्या रिसेप्शन सोहळ्याला उपस्थिती लावत नवविवाहित दाम्पत्याला आयुष्यातील नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या.
Anirudh- Kavya Maran Reception Event Photos
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सुद्धा शनिवारी झालेल्या रिसेप्शन सोहळ्याला उपस्थिती लावत अनिरुद्ध आणि काव्या या नवविवाहित दाम्पत्याला आयुष्यातील नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या.
Anirudh- Kavya Maran Reception Event Photos
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन आणि सुपरस्टार रजनीकांत यांनी नवविवाहित दाम्पत्य असलेल्या अनिरुद्ध आणि काव्या यांच्यासोबत खास शैलीमध्ये एक ग्रुप फोटो काढला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here