Home ताज्या घडामोडी Chembur Accident: कर्तव्यावर असतानाच काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

Chembur Accident: कर्तव्यावर असतानाच काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

0
Chembur Accident: कर्तव्यावर असतानाच काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू
Photo: Prahaar

मुंबई : चेंबूर येथील रहेजा अक्रोपोलिस गृहसंकुलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अ‍ॅडोनिस इमारतीमध्ये लोखंडी गेट कोसळून एका 46 वर्षीय सुरक्षा रक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास घडली. मृत सुरक्षा रक्षकाचे नाव सुनील कुमार पितरदेव गुप्ता असे असून, ते इमारतीमध्ये सुरक्षेची जबाबदारी पार पाडत होते. मात्र कर्तव्यावर असतानाच गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला. ऑन ड्युटी ते इमारतीचे गेट उघडण्याचा प्रयत्न करत होते. याचवेळी अचानक गेट तुटून त्यांच्या अंगावर कोसळले. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली.

सदर घटनेनंतर त्यांना तातडीने गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. गुप्ता हे मूळचे उत्तर प्रदेशातील असून, गेल्या काही वर्षांपासून संबंधित गृहसंकुलात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. ते मानखुर्द येथे पत्नीसमवेत राहत होते. त्यांची पत्नी घरकाम व स्वयंपाकाचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती.

https://www.prahaar.in/2026/11/21/will-not-leave-the-farmer-in-the-lurch-during-a-crisis-shinde-offers-a-prayer-at-the-feet-of-lord-vitthal/

या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी तातडीने जाऊन पाहणी केली. मृत व्यक्तीची आकस्मिक मृत्यूची नोंद केली. शिवाय,  घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येत आहे. गेटच्या देखभालीची जबाबदारी गृहसंकुल व्यवस्थापनाची होती का, तसेच या दुर्घटनेमध्ये कोणाचा निष्काळजीपणा झाला आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. गृहसंस्थेचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचे जबाब यासंदर्भात नोंदवले जात आहेत.

या दुर्घटनेमुळे गृहसंकुलांमधील प्रवेशद्वार, लोखंडी गेट तसेच इतर सुरक्षा यंत्रणांच्या नियमित देखभालीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. निष्काळजीपणामुळे एखाद्या कामगाराचा जीव जाण्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई होण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here