Home ताज्या घडामोडी Prachi Desai: दीड वर्षांनंतर प्राची देसाई सोशल मीडियावर परतली! ‘Proof of existence’ म्हणत शेअर केले फोटो

Prachi Desai: दीड वर्षांनंतर प्राची देसाई सोशल मीडियावर परतली! ‘Proof of existence’ म्हणत शेअर केले फोटो

0
Prachi Desai: दीड वर्षांनंतर प्राची देसाई सोशल मीडियावर परतली! ‘Proof of existence’ म्हणत शेअर केले फोटो
अभिनेत्री प्राची देसाई एका वर्षापेक्षा जास्त काळानंतर सोशल मीडियावर परत आली आहे, तिने आपल्या इंस्टाग्रामवर Proof of existence असं कॅप्शन देत फोटोस शेयर केले आहेत.
‘रॉक ऑन’,’वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’,’बोल बच्चन’ अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये प्राची ने काम केले आहे. त्याचबरोबर जन्नत 2, अजहर या चित्रपटांत अभिनेता इम्रान हश्मी सोबत प्राचीनी अभिनय केला आहे.
गोड चेहरा, क्युट स्माईल आणि निरागस अभिनयामुळे ती कायम प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री राहिली. मात्र प्राची गेल्या अनेक वर्षांपासून स्क्रीनवरुन आणि सोशल मीडियावरुनही गायब होती.
तिची शेवटची पोस्ट 10 जून 2025 ची होती. आता जवळपास दीड वर्षांनी तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.
एका कॅफेमध्ये आपले फोटो पोस्ट करत तिने ‘अस्तित्वाचा पुरावा’ असं कॅप्शन दिलं आहे. दीड वर्ष गायब असल्याने प्राची देसाई नेमकी आहे कुठे? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. त्यावर आता तिने थेट फोटो शेअर करत उत्तर दिलं आहे.
व्हाईट टीशर्ट आणि ब्लू जीन्स या कॅज्युअल लूकमध्ये प्राचीने फोटो शेयर केले आहेत. यात ती क्युट दिसत आहे. प्राची आता 38 वर्षांची असून सिंगल आयुष्य जगत आहे.
प्राचीला एकता कपूरच्या ‘कसम से’ या टीव्ही मालिकेतून लोकप्रियता मिळाली. नंतर ‘रॉक ऑन’मधून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here