Home महाराष्ट्र नाशिक Nashik Crime : पत्नीच्या खुनाचा खोटा कॉल करणं पडलं महागात ! पतीविरोधात गुन्हा दाखल

Nashik Crime : पत्नीच्या खुनाचा खोटा कॉल करणं पडलं महागात ! पतीविरोधात गुन्हा दाखल

0
Nashik Crime : पत्नीच्या खुनाचा खोटा कॉल करणं पडलं महागात ! पतीविरोधात गुन्हा दाखल

दिंडोरी: नाशिकच्या दिंडोरीमध्ये एका व्यक्तीने चक्क आपल्या पत्नीचा खून झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली. विशेष म्हणजे, डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून त्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडवली. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला असता, संपूर्ण प्रकार खोटा असल्याचं समोर आलं. याप्रकरणी आता संबंधित पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास दिंडोरी तालुक्यातील बोराचा पाडा येथे एका महिलेचा खून झाल्याचा कॉल डायल ११२ वर आला. कॉलरने आपली पत्नी गंगुबाई डाबल हिचा विळवंडी शिवारात खून झाल्याची माहिती दिली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सरपंचांनाही घटनास्थळी बोलावण्यात आलं.

https://www.prahaar.in/2026/11/21/power-supply-to-be-shut-off-in-jail-road-muktidham-and-deolali-camp-areas-on-this-day/

मात्र, पोलिसांनी चौकशी केली असता धक्कादायक सत्य समोर आलं. पुंडलिक डाबल असं कॉल करणाऱ्या व्यक्तीचं नाव असून, किरकोळ घरगुती वादातून त्याची पत्नी मुलांसह मामाच्या गावी गेली होती. पत्नीचा खून झाल्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी खातरजमा केली असता पत्नी आणि मुलं सुखरूप असल्याचंही निष्पन्न झालं.

केवळ पोलिसांना त्रास देण्याच्या उद्देशाने डायल ११२ वर खोटी माहिती दिल्याप्रकरणी पुंडलिक डाबल याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २१७ अंतर्गत दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, डायल ११२ ही सेवा नागरिकांच्या आपत्कालीन मदतीसाठी आहे. त्यामुळे या सेवेचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here