Home देश JEE Main 2027 : Session 1 साठी नोंदणी उद्या संपणार; चुकवू नका ही शेवटची संधी

JEE Main 2027 : Session 1 साठी नोंदणी उद्या संपणार; चुकवू नका ही शेवटची संधी

0
JEE Main 2027 : Session 1 साठी नोंदणी उद्या संपणार; चुकवू नका ही शेवटची संधी
AI Generated Image

JEE Main 2027 Session 1 परीक्षेसाठी नोंदणी करण्याची मुदत उद्या, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी संपणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) ही माहिती दिली आहे. आतापर्यंत एकूण १३,२९,६७० अर्ज सादर झाले असून, त्यापैकी ११,१९,०६२ उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून परीक्षा शुल्क भरलं आहे. ज्या उमेदवारांनी अजून अर्ज भरला नाही, त्यांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in वर जाऊन अर्ज भरावा. मुदत संपल्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

लेट फीने अर्ज करण्याची संधी

नियमित मुदतीत अर्ज भरायचा राहिलेल्या उमेदवारांसाठी NTA ने लेट फी विंडोची सुविधा दिली आहे. ही विंडो २३ ते २६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत खुली राहणार आहे. यामध्ये अतिरिक्त शुल्क भरून अर्ज करता येईल. अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर २७ ते २९ नोव्हेंबर २०२६ दरम्यान करेक्शन विंडो उघडली जाणार आहे. या विंडोमध्ये उमेदवारांना आपल्या अर्जातील चुकांची दुरुस्ती करता येणार आहे.

https://www.prahaar.in/2026/11/21/a-major-twist-in-zhimma-3-who-will-be-joining-the-gang-of-women/

अर्ज कसा भरायचा?

स्टेप १ : अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in वर जा.
स्टेप २ : होमपेजवर “Online Application Form for JEE Main 2027 – Session 1” या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३ : आवश्यक माहिती वापरून नोंदणी पूर्ण करा.
स्टेप ४ : अर्ज क्रमांक आणि पासवर्डने लॉगिन करून शैक्षणिक आणि वैयक्तिक माहिती भरा.
स्टेप ५ : फोटो आणि सही यासारखी आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.
स्टेप ६ : शेवटी परीक्षा शुल्क भरून अर्ज सबमिट करा. कन्फर्मेशन पेज डाऊनलोड करून जपून ठेवा.

महत्त्वाच्या तारखा

सिटी इंटिमेशन स्लिप : ३० डिसेंबर २०२६
अॅडमिट कार्ड : १३ जानेवारी २०२७
परीक्षा तारीख : २०, २१, २२, २३, २४ आणि २८ जानेवारी २०२७

JEE Main 2027 परीक्षा १३ भाषांमध्ये होणार आहे. यामध्ये इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचा समावेश आहे. इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी JEE Main ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आजच अर्ज भरण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here